Goa Tourism Law | पर्यटन खात्यातर्फे लवकरच रॉकचे वाटप

पर्यटन मंत्री रोहन खंवटे : नवीन कायदा आज मंजूर होणार
Goa Tourism
Goa Tourism
Published on
Updated on

पणजी : पर्यटन खात्यातर्फे रॉकचे वाटप लवकरच केले जाणार आहे. एका रॉकचालकाने न्यायालयात धाव घेतल्यामुळे वाटपाला उशीर झाला आहे. त्याचबरोबर गोवा सरकार रॉकसंदर्भातील नवीन कायदा बुधवारी मंजूर करणार असून, त्यानंतर लगेच राज्यातील रॉकचे वाटप केले जाईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

मंगळवारी पर्वरी येथे गोवा रॉकचालक रोहन खंवटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची भेट घेतली. या भेटीनंतर खंवटे यांनी सांगितले की, पर्यटन खात्याने रॉक वाटपाला जाणीवपूर्वक उशीर केलेला नाही. एका स्थानिक रॉकचालकाने न्यायालयात धाव घेतल्याने आणि या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी असल्याने वाटप रखडले.

बुधवारी नवीन कायदा मंजूर झाल्यानंतर लगेच शॅकचे वाटप केले जाईल. पूर्वी शेंक लवकर उभारले जात असल्याने पर्यटकांसाठी ते उपलब्ध असायचे. सध्या पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत; मात्र रॉक अद्याप उभारण्यात आलेले नाहीत, असे खंवटे यांनी सांगितले.

Goa Tourism
Porvorim Firing Case | पर्वरी गोळीबार प्रकरणाच्या तपासाला वेग; लवकरच ठोस यश : आलोक कुमार

गोवा रॉकचालक संघटनेचे अध्यक्ष कुझ कार्दोझ यांनी सांगितले की, गेल्या वर्षी १६ ऑगस्टला रॉकचे वाटप केले होते. २२ ऑगस्टला जागाही मोजून देण्यात आली होती आणि १ सप्टेंबरपूर्वी रॉक सुरू झाले होते. यंदा न्यायालयीन प्रकरणामुळे रॉक वाटपाला विलंब झाला. आता रॉकचे वाटप लवकर करावे, यासाठी पर्यटनमंत्र्यांची भेट घेतल्याचे कार्दोझ यांनी सांगितले.

Goa Tourism
Goa Police suspension: भ्रष्टाचार अन् गैरवर्तन... गोवा पोलीस दलातील ५ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; नक्की काय घडलं?

पर्यटन खात्याच्या अखत्यारित ३७५ रॉक....

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले असून, त्यांच्यासाठी लवकरात लवकर शॅक उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. राज्यभरात पर्यटन खात्याच्या अखत्यारित ३७५ रॉक आहेत. त्यातील काही रॉक उभारले जात नाहीत; मात्र सुमारे ३५० रॉक प्रत्यक्षात उभारले जातात, असे कार्दोझ यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news