

पणजी : पुढारी वृत्तसेवा
उत्तर गोवा जिल्ह्यातील म्हापसा शहरात असणाऱ्या डिटेन्शन सेंटरमधून तीन बांगलादेशी पळून गेले. ही घटना आज (रविवार) पहाटेच्या सुमारास घडली.
डिटेन्शन सेंटरच्या छताचे पत्रे काढून हे तिघेही पसार झाले आहेत. मोहम्मद हलवादेर, मोहम्मद हिलाल आणि मोहम्मद मरीदा अशी या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. या प्रकरणी मागचा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.