

The protective wall of Shri Purvacharya Devasthan collapsed, traffic on the road closed
पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सध्या पावसाने जोर धरल्याने सगळीकडे पडझड होत आहे. श्री पुर्वाचार्या देवस्थानची भली मोठी संरक्षक भिंत आज सकाळी ६.४५ वाजता रस्त्यावर कोसळली. रस्ता मातीच्या ढिगाऱ्याखाली गेला, त्यामुळे रहदारी दोन्ही बाजुंनी बंद झाली. सुदैवाने यावेळी रस्त्यावर रहदारी कमी होती.
यावेळी बांदोड्याचे सरपंच रामचंद्र नाईक, स्थानिक पंच सदस्या मुक्ता नाईक, सागर मुळवी, जयराज नाईक, दिनेश वळवईकर व स्थानिकांनी मातीचा ढिगारा, चीरे बाजूला करून रहदारीस रस्ता मोकळा करून दिला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.