केपेला मडगावशी जोडणारा पारोडचा मुख्य रस्ता गेला पाण्याखाली

केपेला मडगावशी जोडणारा पारोडाचा मुख्य रस्ता कुशावती नदीच्या पुरात बुडाला
The main road of Parod connecting Kepe with Margaon went under water
केपेला मडगावशी जोडणारा पारोडचा मुख्य रस्ता गेला पाण्याखालीPudhari Photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

पारोड्याचा पूल आणि मुख्य रस्ता पुराच्या पाण्यात बुडाल्याच्या परंपरेत यंदाही खंड पडलेला नाही. सरकारच्या अनास्थेमुळे गेल्या आठ दिवसांत सलग दुसऱ्यांदा केपेला मडगावशी जोडणारा पारोडाचा मुख्य रस्ता कुशावती नदीला आलेल्या पुरात बुडाला. परोड्यातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.

रविवारी रात्री उशिरा कुशावतीला पूर आला होता. पहाटे पुराचे पाणी मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचले. काराळी पासून चंद्रेश्वर पर्वतावर जाणाऱ्या मार्गापर्यत सुमारे तीन किलोमीटर पर्यत रस्ता पाण्यात गेला आहे. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाण्यासाठी लोकांना दुसरा मार्ग अवलंबवावा लागला आहे. उलट बाजुने असलेल्या लोकवस्तीचाही संपर्क तुटला आहे. कुशावतीच्या पाण्यात पूल पूर्णपणे बुडुन गेला आहे. तसेच रस्त्याला लागून असलेल्या घरांनाही पुराचा तडाका बसला आहे.

परोडा बुडणे हे आता नित्याचेच झाले असून, यंदाच्या पावसात परोडा दुसऱ्यांदा बुडाले आहे. रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात असली तरीही कोणत्याही सरकारला ते शक्य झालेले नाही. याची माहिती माजी सरपंच दिपक खरंगटे यांनी दिली.रस्ता बुडाल्याने मडगावला जाणारी वाहतूक चांदोर मार्गे वळवण्यात आली आहे. असे असले तरी मडगाव आणि पणजीला कामधंद्याच्या निमित्ताने जाणाऱ्या चाकरमन्यांना मात्र हा रस्‍ता बंद झाल्‍याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर बसेस बंद ठेवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रस्ता बुडाल्याने मडगावला जाणारी वाहतूक चांदोर मार्गे वळवण्यात आली आहे. असे असले तरी मडगाव आणि पणजीला कामधंद्याच्या निमित्ताने जाणाऱ्या चाकरमन्यांना मात्र हा रस्‍ता बंद झाल्‍याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर बसेस बंद ठेवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news