'तो' व्हिडिओ गोव्यातील नाही; पोलिसांचे स्‍पष्‍टीकरण

आफ्रिकेतल्‍या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल
That 'video is not from Goa; Clarification of Goa Police
'तो' व्हिडिओ गोव्यातील नाही; पोलिसांचे स्‍पष्‍टीकरण File Photo
Published on
Updated on

पणजी : प्रभाकर धुरी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गोव्यात बोट बुडून दुर्घटना घडल्याचा व्हिडिओ फिरत आहे. मात्र, तो व्हिडिओ गोव्यातील नाही असे स्पष्टीकरण गोवा पोलिसांनी दिले आहे.

व्हायरल व्हिडिओसंदर्भात दावा केला जात आहे की, गोव्याच्या किनाऱ्याजवळ बोट उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४० जणांची सुटका केली आहे, तर २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत ६४ जण बेपत्ता आहेत असा दावा त्या व्हिडिओ संदर्भात केला होता.

परंतु, या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केल्यावर आणि उपलब्ध ऑनलाइन माहिती शोधल्यावर असे आढळून आले की, हा व्हिडिओ गोमा, काँगो, (आफ्रिका) येथील घटनेशी संबंधित आहे. त्यामुळे असत्य बातम्या शेअर करु नयेत आणि अचूक माहितीसाठी अधिकृत स्रोतांवर विसंबून राहावे, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news