Tarun Tejpal Supreme Court appeal |तरुण तेजपालची सर्वोच्च न्यायालयात धाव, उच्च न्यायालयाच्या १० वर्षांच्या शिक्षेला आव्हान

तरुण तेजपालची सर्वोच्च न्यायालयात धाव, उच्च न्यायालयाच्या १० वर्षांच्या शिक्षेला आव्हान
Tarun Tejpal
Tarun Tejpal
Published on
Updated on

पणजी : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल याने बलात्कार प्रकरणातील दोषसिद्धी आणि १० वर्षांच्या कठोर कारावासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यापूर्वीच गोवा सरकारने विशेष याचिका सादर करून त्याला कायद्यातील अधिकाधिक असलेली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली आहे.

Tarun Tejpal
Panaji coconut price hike|पणजीत नारळाचे दर वाढले, श्रावणामुळे परराज्यातून दुप्पट भाजीपाल्याची खरेदी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ६ ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात तेजपाल यांना २०१३ मध्ये आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्याला १० वर्षांच्या कठोर कारावास तसेच १०.२१ लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात आता तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

२०१३ मध्ये गोव्यातील एका कार्यक्रमादरम्यान महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. गोव्यातील विशेष सत्र न्यायालयाने यापूर्वी तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा विचार केल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय बदलत तेजपाल यांना दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

Tarun Tejpal
Goa - आप, आरजीला 'हात'; फॉरवर्डचे काय?

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे तेजपाल यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढल्या असून, दोषसिद्धी रद्द करावी तसेच शिक्षा स्थगित करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत करण्यात आल्याचे वृत्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news