Subhash Shirodkar | कमी पावसातही गोव्याला दिलासा! यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांचे आश्वासन

Subhash Shirodkar | जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर : पिळगाव ते नार्वे भूमिगत जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ
Subhash Shirodkar
Subhash Shirodkar
Published on: 
Updated on: 

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात सरकारच्या जलस्रोत खात्यातर्फे गेली साडेचार वर्षे अविश्रांतपणे केलेल्या कामांचे चांगले परिणाम राज्याला आता दिसू लागणार आहेत. यावर्षी गोव्यात जरी पाऊस कमी पडला असला, तरी पाण्याची कोणतीही कमतरता गोव्याला भासणार नाही. त्यासाठी गोवेकरांनीही पाण्याचा वापर करताना सांभाळून करावा.

Subhash Shirodkar
Goa heavy rainfall - पावसाने पुन्हा झोडपले, २४ तासांत पणजीत ५५ मि.मी.ची नोंद; डिचोली, सासष्टीत पडझड

आपल्या हातून पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी. सरकार पाण्याच्या बाबतीत गोवेकरांची योग्य काळजी घेत असून, लोकांनीही पिण्याच्या तसेच सिंचनाच्या बाबतीत आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

जलस्रोत खात्यातर्फे पिळगाव ते नार्वे या दरम्यान तिळारी कालव्याचे पाणी नेण्यासाठी घालण्यात येणाऱ्या भूमिगत कालव्याच्या कामाचा शुभारंभ पिळगाव येथे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, जिल्हा पंचायत सदस्य कुंदा मांद्रेकर, पिळगावचे उपसरपंच उमाकांत परब गावकर, मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, भाजप उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष दयानंद कारबोटकर व इतरांची उपस्थिती होती.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले की, पिळगाव ते नार्वे या दरम्यान साकारण्यात येणाऱ्या या कालव्यामुळे पिळगाव व परिसरातील शेतीही बहरणार आहे. मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते भूमीपूजन करून तसेच कोनशिला अनावरण करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामावर ४५ कोटी खर्च करून ८ किलो मीटर लांबीची जलवाहिनी पिळगाव ते नार्वेपर्यंत घालण्यात येणार आहे.

Subhash Shirodkar
Goa Fire News | गोव्यात 24 तासांत तीन ठिकाणी 'अग्नितांडव'; डिचोली, मोप आणि माशेलमध्ये लाखोंचे नुकसान

शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार : शिरोडकर

पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. जलस्रोत खात्यामार्फत शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जात असून, शेतकऱ्यांनीही या सरकारच्या प्रयत्नांना साथ देणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी एक मीटरही जागा खाली न ठेवता त्यावर काहीतरी लागवड करावी. या कामासाठी सरकार खर्च करीत असलेला निधी हा लोकांचाच असून त्याचा लोकांना लाभ मिळावा अशीच अपेक्षा आहे, असेही यावेळी मंत्री शिरोडकर यांनी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news