इफ्फी संस्मरणीय करण्यावर भर

सुकाणू समितीची बैठक : शेखर कपूर यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती
Steering Committee Meeting
पणजी : इफ्फीचे महोत्सव संचालक शेखर कपूर यांनी सुकाणू समितीच्या सदस्यांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : यंदाचा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिक लोककेंद्रित, समावेशक आणि दिमाखदार बनवण्यासाठीच्या मंगळवारी 24 रोजी विशेष चर्चा झाली.

महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, इफ्फीच्या सुकाणू समितीचे सदस्य आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर केंद्रीय सचिव जाजू यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. 55 वा इफ्फी महोत्सव सिने जगताचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य चित्रपटप्रेमींसाठी संस्मरणीय ठरावा आणि भारतीय सिनेमा आणि सिने प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी चैतन्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठीचे उपाय आणि उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली. महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपटाचा गौरव करण्यासाठी विशिष्ट संकल्पनेवरील परेडचे आयोजनाबाबतही चर्चा झाली.

परेड व्यतिरिक्त इफ्फीमध्ये एक मनोरंजन आर्केड असेल, ज्यामध्ये लोकांच्या सहभागाने भारतीय सिनेमा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा केला जाईल. या संवादात्मक कार्यक्रमात उपस्थितांना चित्रपट उद्योग आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा परिचय होईल. या महोत्सवात तरुणांना आणि सिनेसृष्टीतील उदयोन्मुख प्रतिभेला आपले काम प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाईल. भारतीय चित्रपटाच्या संपन्न परिदृश्याचे दर्शन घडवणारा, चित्रपट निर्माते, अभिनेते आणि जगभरातील चित्रपटप्रेमींना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा इफ्फी अविस्मरणीय व्हावा, यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार वचनबद्ध असे सचिव जाजू म्हणाले.

सुकाणू समितीचे सदस्य बॉबी बेदी आणि रवी कोट्टरक्कर, ‘एनएफडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट संयुक्त सचिव वृंदा देसाई, दिग्दर्शिका अनुरिमा शर्मा, ओएसडी फिल्म्सचे श्रीरंग मुकुंदन, ईएसजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा आदी बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीपूर्वी केंद्रीय सचिव संजय जाजू यांनी महोत्सवाच्या स्थळांना भेटी दिल्या आणि संबंधित अधिकार्‍यांना महोत्सवाच्या तयारीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news