ST Reservation Goa | एसटी समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार; आमदार गोविंद गावडे

ST Reservation Goa | आमदार गावडे : कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्टीकरण
MLA Govind Gawde
MLA Govind Gawde
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

एसटी समाजाला राजकीय आरक्षण नोव्हेंबर अखेरपर्यंत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. आरक्षणासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सरकार दिलेले आश्वासन पूर्ण करेल, असा विश्वास आमदार गोविंद गावडे यांनी व्यक्त केला.

MLA Govind Gawde
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

आरक्षणासाठी आवश्यक मंजुरी मिळाली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. नोव्हेंबरपर्यंत आरक्षण लागू झाल्यास त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करता येईल. मात्र, आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी निवडणुका जाहीर झाल्यास त्यावेळी पुढील दिशा ठरवली जाईल, असे गावडे यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना गावडे म्हणाले की, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना कोणीही रोकू शकत नाही. दरम्यान, राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी यापूर्वी आंदोलने करण्यात आली आहेत. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी अपेक्षा समाजाकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news