Goa Soham Naik Case | चौथ्या गुन्ह्यात सोहम नाईकला घेणार ताब्यात

क्राईम ब्रँचकडून न्यायालयाकडे विनंती अर्ज
Goa Soham Naik Case
Goa Soham Naik Case
Published on
Updated on

पणजी : कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याची तिसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याने त्याच्याविरुद्ध नोंद केलेल्या चौथ्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली.

क्राईम ब्रँचने तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयात संशयित सोहम याला उभे केले होते. तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्याला ती वाढवून देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौथ्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

संशयित सोहम नाईक याने गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुलींना साावज बनवून त्यांना अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडले होते. तसेच तो त्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्याने काढलेले अश्लील व्हिडीओ सोशल मीडियाकडे पोहोचल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news