Goa Flyover Project: जुने गोवे ते खांडोळा मार्गावरील गवंडाळी पुलासाठी नवीन तंत्रज्ञान; सिमेंटऐवजी लोखंडी बॉक्सेसचा वापर

Goa Flyover Project: सिमेंटऐवजी लोखंडी बॉक्सेस बसवण्याचे काम सुरू; चतुर्थीनंतरच काम पूर्ण होण्याची शक्यता
Goa Flyover Project
Goa Flyover Project
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजीपासून सांखळीला पोहोचण्यास जवळच्या अंतरासाठी सोयीचे ठरणार्या जुने गोवे ते खांडोळा या रस्त्यावरील गवंडाळी धावजी रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधला जात आहे. गोव्यात आतापर्यंत न वापरलेले नवे तंत्रज्ञान या पुलासाठी वापरले जात आहे.

Goa Flyover Project
Raigad Congress crisis: महेंद्र घरत यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी; घरत यांना हटवल्याने रायगड काँग्रेसमध्ये बंड

सिमेंटऐवजी लोखंडाचे मोठेमोठे बॉक्सेस तयार करून ते बसवण्यात येत आहेत. मात्र, हे काम बरेच संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक आणि नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वी ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार, असे सांगण्यात आले होते. आता पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी उड्डाणपुलाचे अद्यापही बरेच काम बाकी आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीनंतरच या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे सध्या तरी दिसून येते. परिणामी, संथगतीने सुरू असलेल्या या कामाबाबत वाहनचालकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Goa Flyover Project
Goa Congress Controversy: मनीषा उसगावकर अन् शामिला सिद्धिकी यांची 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी!

दुचाकीसाठी सिमेंट रस्ते

कंत्राटदाराने दुचाकी व चारचाकी, लहान वाहनांसाठी येथे चांगले पर्यायी रस्ते उपलब्ध केले आहेत. सिमेंट काँक्रिटचे रस्ते दोन्ही बाजूला बांधण्यात आले असून, मधोमध उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ च्या दरम्यान मोठ्या वाहनांना येथून बंदी आहे. तरी काही वाहने ये-जा करताना दिसतात. मात्र दुचाकींना दिवस-रात्र परवानगी असल्यामुळे बाणास्तारीमार्गे जाण्याच्या दुचाकीस्वारांना सोयीचे ठरत आहे.

काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

बऱ्याच दिवसांपासून हे काम सुरू असल्यामुळे वाहनचालकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बाणास्तारीमार्गे ये-जा करणे दुचाकीस्वारांना सोयीचे ठरत असले तरी पुलाचे काम लवकर करून सर्वांचाच त्रास थांबवावा, अशी मागणी वाहनचालक करू लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news