दिल्लीतील बैठकीबाबत नेत्यांचे मौन

विविध विषयांवर चर्चा : वरिष्ठांकडून पक्षकार्य वाढीच्या सूचना
Silence of the leaders regarding the meeting in Delhi
दिल्लीतील बैठकीबाबत नेत्यांचे मौन Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : मंत्रिमंडळातील कलह, पक्षांतर्गत असंतोष आणि नागरिकांमध्ये सरकारविरोधात निर्माण नाराजी या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना दिल्लीत सविस्तर चर्चा केली. या बैठकीविषयी या दोन्हीही नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती असून, दोघांनाही पक्ष वाढीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्य मंत्री राणे यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम प्रशासकीय कामकाज आणि पक्षाच्या प्रतिमेवर पडू लागल्याने पक्षश्रेष्ठीही अस्वस्थ होते. त्यातच राज्यातील मेगा प्रकल्प, बेकायदा जमीन रूपांतरे, डोंगर कापणी अशा विषयांना विरोधकांनी खतपाणी घालत राज्यासह देशभरात सरकारची प्रतिमा बिघडविण्याचा प्रयत्न केल्याने अखेर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना दिल्लीत बोलवण्यात आले.

सुरुवातीला ही बैठक पक्षीय कामकाजासंदर्भात असल्याचे सांगण्यात आले, असले तर यात प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे सहभागी नव्हते. यावरून या बैठकीबाबत राज्यात तर्कवितर्क आणि राजकीय चर्चांना जोरदार वेग आला होता. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. वरिष्ठांनी या दोन्हीही नेत्यांना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. सध्या भाजप सदस्यता मोहीम सुरू असून ही मोहीम यशस्वी करण्याची सूचना देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news