शिवोलीत 11.7 कोटींचे ड्रग्ज जप्त

अमली पदार्थ विरोधी सेलची कारवाई : केरळ येथील एकास अटक
Shivoli drug seizure
पणजी ः ड्रग्ज कारवाईबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक सुनीता सावंत. बाजूस उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क, पोलिस निरीक्षक सजित पिल्लई.Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) शिवोली येथे छापा टाकून 110.72 ग्रॅम एलएसडी ड्रग्ज जप्त केले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 11.07 कोटी रुपये एवढी आहे. याप्रकरणी मूळ पलक्कड,केरळ येथील मोहम्मद समीर (29वर्षे) याला एएनसीने सोमवारी रात्री अटक केली. संशयितास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मागील 5 वर्षांपासून तो गोव्यात राहत होता आणि सध्या तो एक गेस्ट हाऊस चालवत होता. बामन वाडो, शिवोली येथे स्वतंत्र घर भाड्याने घेऊन तो ड्रग्जचा व्यवसाय चालवत होता. एएनसीच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एएनसीने जप्त केलेल्या एलएसडी द्रावणाचे प्रमाण अंदाजे 10 ते 12 लाख एलएसडी ब्लॉट्स किंवा एलएसडी पेपर्स तयार करण्यासाठी पुरेसे आहे. या एका ब्लॉटची किंवा एलएसडी पेपरची किंमत 3 ते 5 हजार रुपये आहे.

अधीक्षक सुनीता सावंत म्हणाल्या, एएनसीला माहिती मिळाली की एक केरळ रहिवासी उच्च मायक्रॉन एलएसडी ड्रॉप्समध्ये व्यवहार करत असल्याची माहिती मिळताच एएनसीने सापळा रचला व संशयिताला 4.72 ग्रॅम एलएसडी लिक्विडसह पकडण्यात आले. तो बामणवाडा येथे भाड्याच्या घराच्या आवारात अमली पदार्थ वितरीत करण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्याकडे 4.72 ग्रॅम एलएसडी मिळाले. त्यानंतर एएनसी अधिकार्‍यांनी संशयिताच्या घराची झडती घेतली असता 106 ग्रॅम एलएसडी द्रव आणि 101 ग्रॅम गांजा जप्त केला. संशयित आरोपी ड्रग्ज थेंबात विकायचा आणि आवश्यकतेनुसार त्याच्या ग्राहकांना द्रव आणि ब्लॉटिंग पेपर्स पुरवायचा. एलएसडी लिक्विड सायकेडेलिक ड्रग्जचा वापर सायट्रान्स पार्टी सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि तो जगातील सर्वात शक्तिशाली अमली पदार्थांपैकी एक मानला जातो. ही कारवाई एएनसीचे पोलिस निरीक्षक सजित पिल्लई यांच्या सहाय्याने हवालदार उमेश देसाई, कॉन्टेबल गोदिश गोलतेकर, मकरंद घाडी साईराज नाईक, व्यंकटेश माईणकर, अक्षय नाईक आणि चालक विठ्ठल फडते यांच्या सहाय्याने करण्यात आली. एएनसीचे पोलिस उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क यांच्या देखरेखीखाली आणि पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या तरी उघड झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news