Shiv Sena Goa | गोव्यात शिवसेना 30 जागांवर लढणार; भाजपसोबत युतीचा विचार नाही : गजानन कीर्तिकर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षाची भूमिका ‘एकला चलो’
पणजी येथे बुधवारी  आयोजित पत्रकार परिषदेत  बोलताना गजानन कीर्तिकर
पणजी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गजानन कीर्तिकरPudhari
Published on
Updated on

Shiv Sena To Contest 30 Seats Goa Elections

पणजी : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) 30 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असून त्यासाठी पक्षाने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. गोव्यातील भाजप सरकार विविध क्षेत्रांत अपयशी ठरल्याचा आरोप करत सध्या तरी भाजपसोबत युती करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शिवसेना नेते, माजी खासदार आणि माजी मंत्री गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

पणजी येथे बुधवारी (दि.१७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा संपर्कप्रमुख सुभाष सावंत, समन्वयक अरुण मोरे, राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, सरचिटणीस काशिनाथ मयेकर, उत्तर गोवा प्रमुख सुनील सांतिनजकर यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पणजी येथे बुधवारी  आयोजित पत्रकार परिषदेत  बोलताना गजानन कीर्तिकर
Shiv Sena UBT Split: शिंदे गटाचं ‘ऑपरेशन टायगर’ अद्याप अपूर्ण? दोन खासदारांच्या भूमिकेमुळे शिंदेंच राजकीय गणित बिघडणार

कीर्तिकर म्हणाले की, 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन असून ‘शिवसंपर्क अभियान’ राबवून सदस्य नोंदणी सुरू आहे. या अभियानाला गोव्यातील 30 मतदारसंघांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पक्षाने 30 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षाची भूमिका ‘एकला चलो’ अशी असली तरी भविष्यात पक्षश्रेष्ठींनी युतीबाबत निर्णय घेतल्यास त्यानुसार पुढील भूमिका ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पणजी येथे बुधवारी  आयोजित पत्रकार परिषदेत  बोलताना गजानन कीर्तिकर
Shiv Sena UBT Crisis : एखाद्या गटाचे कोणत्याही पक्षात विलीनीकरणाची तरतूद नाही : शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा अध्‍यक्षांना पत्र

गोव्यातील विद्यमान सरकारविरोधात जनतेत नाराजी असल्याचा दावा करत स्थानिक प्रश्न, बेरोजगारी, भूमिपुत्रांवरील अन्याय आणि सेटलमेंट झोनमुळे शेतीवर होणारे परिणाम या मुद्द्यांवर शिवसेना जनतेसोबत संघर्ष करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपसोबत युती असली तरी इतर राज्यांमध्ये अशी आघाडी नसल्याचे सांगत गोव्यातही सध्या युतीचा प्रश्न उद्भवत नसल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

याशिवाय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) अहवालाचा दाखला देत त्यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्था, बेरोजगारी आणि वाढत्या कर्जबाजारीपणावर सरकारवर टीका केली. गोवा अनेक बाबतीत केंद्र सरकार व इतर राज्यांवर अवलंबून असून राज्यावर सुमारे 3,945 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news