

पणजी, पुढारी वृत्तसेवा : Shekhar Kapur IFFI Festival Director : गोव्यात होणाऱ्या ५५ व्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या महोत्सव संचालकपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने दिली माहिती आहे. शेखर कपूर हे 55 व्या आणि 56व्या आवृत्तीसाठी महोत्सव संचालक असतील. त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली असून अनेक पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे.