Revolutionary Goans | रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर; शविना शिरोडकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद

Revolutionary Goans | नवी राज्य कार्यकारिणी जाहीर : युतीची चर्चा करण्यासाठी समिती गठीत
Revolutionary Goans
Revolutionary Goans
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) आपल्या संघटनेची पुनर्रचना करत नव्या राज्य कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या राज्य परिषदेच्या बैठकीत लोकशाही प्रक्रियेचा अवलंब करून निवडणुकीच्या माध्यमातून ही नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

Revolutionary Goans
Lodha One Goa Project | लोढा कंपनीच्या 'वन गोवा' प्रकल्पासाठी 6 कोटींची खंडणी

पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शविना नाईक शिरोडकर यांची, तर उपाध्यक्षपदी विपिन नाईक यांची निवड केली आहे. मेल्विन डिसिल्व्हा आणि प्रेमानंद गावडे यांची अनुक्रमे सरचिटणीस आणि संघटक सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे. याशिवाय जयेंद्रथ पाडोलकर यांची सचिवपदी, तर कँडिडो कोरिया यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष शिरोडकर यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. पक्षसंघटना तळागाळापर्यंत मजबूत करणे आणि गोवेकरांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमकपणे मैदानात उतरणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

Revolutionary Goans
Solapur Flight Services: सोलापूर-गोवा, बंगळुरु, हैदराबाद विमानसेवा मृगजळच

गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, नोकरभरतीत गैरव्यवहार, अपघातांचे वाढते प्रमाण आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सर्व मुद्द्यांवरून विद्यमान सरकारविरोधात लढा उभारण्यासाठी पक्ष पुन्हा एकदा संघटित होत असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने पूर्ण तयारी सुरू केली असून, येत्या गणेश चतुर्थीपूर्वी सर्व जिल्हा आणि ब्लॉक कमिट्यांची रचना पूर्ण केली जाणार आहे. याशिवाय, लवकरच राज्यभर व्यापक सदस्यत्व मोहीम राबवली जाणार आहे. काँग्रेस पक्षाकडून मिळालेल्या युतीबाबतच्या पत्रावर चर्चा करण्यासाठी अमोल नावेलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष युती समिती स्थापन केली आहे.

महिलांना राजकारणात प्राधान्य

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शविना एस. नाईक शिरोडकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वीही गोव्यात राजकीय पक्षांनी प्रदेशाध्यक्ष पद महिलांकडे सोपवले होते. अवघ्या २६ वर्षांच्या तरुण नेतृत्वाकडे पक्षाची धुरा सोपवून आरजीने महिलांना राजकारणात प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news