Sex Scandal | बढाईखोर स्वभावाने समोर आले सेक्स स्कँडल

Sex Scandal |
Sex Scandal | बढाईखोर स्वभावाने समोर आले सेक्स स्कँडलpudhari photo
Published on
Updated on

पणजी : दक्षिण गोव्यातील कुडचडे काकोडा पालिका क्षेत्रातील सोहम नाईक या विशीतील तरुणाचे सेक्स स्कँडल दैनिक ‘पुढारी’ने उघडकीस आणल्यानंतर (शुक्रवार 20 मार्च) गोव्यात एकच खळबळ माजली. या नगरसेवकपुत्राने एक, दोन नव्हे तर तब्बल 16 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा, तसेच त्याचे व्हिडीओ तयार करून ते व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्याचा स्वभावही बढाईखोर. हे व्हिडीओ बनवून तो स्वस्थ बसला नाही, तर मद्य आणि अमली पदार्थांच्या नशेत त्याने ते आपल्या मित्रांनाही फॉरवर्ड केले. त्यातून हे प्रकरण उघडकीस आले.

कॉलेजच्या तृतीय वर्षात शिकणारा हा युवक कॉलेजमध्ये कमी आणि आजूबाजूच्या शाळांच्या परिसरात अधिक दिसायचा. सुंदर मुलींना हेरून मग तो त्यांच्याशी इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटद्वारे संपर्क साधायचा. एकदा ती मुलगी फसली की तो तिच्या मैत्रिणी, बहिणी यांचेही नंबर मिळवून त्यांच्याशीही संपर्क साधायचा. अनेक मुलींना तो खासगी क्षणांचे व्हिडीओ शूटिंग करतोय याचा पत्ताही नव्हता. नंतर तो हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर पुन्हा पुन्हा अत्याचार करायचा. याच मार्गाने तो त्या मुलीच्या संपर्कातील इतर मुलींचे क्रमांक मिळवून त्यांच्याशी मैत्री करायचा.

दै. ‘पुढारी’ने हे प्रकरण उघडकीस आणले तेव्हा बातमीत कुशावती जिल्ह्याचा उल्लेख होता. या जिल्ह्यात चार पालिका येतात. मात्र, केवळ कुडचडे काकोडा पालिका सदस्यांनी कुडचडे पोलिस ठाण्यावर शिष्टमंडळ नेऊन या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली. ही मागणी करणार्‍यांत सोहमचे वडील सुशांत नाईकही होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news