

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी-पणजी बसस्थानकासमोरील येथील अटलसेतू पुलाखाली सकाळी ९ ते १० या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी याठिकाणी एकही वाहतूक पोलिस उपस्थित नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पर्वरीहून वास्को तसेच दक्षिण गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या मार्गावरील वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागत असल्याची माहिती नियमित प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकाने दिली.
सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा ताण वाढत असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचे नियमन NIOS करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.