

पेडणे : हरमल येथील बँकेत काम आटोपून घरी परतणार्या खालचावाडा येथील रहिवासी उल्हास गोकर्णकर (वय 63) यांचा शुक्रवारी हरमल तिठा येथे दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. दुचाकीस्वार हरमल तिठा येथे जात होता, तर उल्हास गोकर्णकर हे रस्ता ओलांडत होते. दुचाकीस्वारने उल्हास यांना धडक दिली. दुचाकी पुढे जाऊन एका अन्य दुचाकीवर आदळली. धडकेत उल्हास हे जमिनीवर कोसळले. त्यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना 108 रुग्णवाहिकेने इस्पितळात नेत असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मांद्रे पोलिस उपनिरीक्षक परेश काळे तपास करीत आहेत.