Goa Rainfall Deficit | पावसाअभावी गोव्यातील 30 टक्के शेतीला फटका शक्य; कृषी संचालक चंद्रहास देसाई यांची माहिती

Goa Rainfall Deficit | कृषी खात्याचे संचालक चंद्रहास देसाई यांची माहिती
Thane rice farming
Thane rice farmingpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील जवळपास ३० टक्के शेती डोंगराळ (मरड) भागात असून, पावसाचे प्रमाण यावर्षी कमी असल्याने या शेतीला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. नुकसानीचा अचूक अंदाज पाहणीनंतरच स्पष्ट होईल. प्रत्यक्ष पाहणी आज, सोमवारपासून सुरू झाली असून, आठवडाभरात त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

Thane rice farming
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

राज्यातील शेते दूरदूर आणि वेगवेगळ्या दुर्गम भागात पसरलेली असल्याने पाहणीच्या कामाला काहीसा वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय शेतीच्या नुकसानीचा अचूक अंदाज लावणे शक्य होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाअभावी पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे.

डोंगराळ भागातील मातीत ओलावा उरलेला नाही, तसेच ओढे किंवा पाटाच्या पाण्याचा थंडपणाही नाही. ही शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने ज्या डोंगराळ भागात पाऊस पडला नाही, तिथील शेती सुकू लागली आहे. सप्टेंबर संपून ऑक्टोबर सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. शनिवारी संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Thane rice farming
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

उकाडा प्रचंड वाढला:


ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमान वाढल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. पावसाची सरासरी ३१ टक्क्यांनी घटली असून, राज्यात यंदा आतापर्यंत केवळ ८२ इंच मोसमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी आहे. यंदा मान्सूनचे आगमनही उशिरा झाले आणि जून महिना कोरडाच गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news