

-निवृत्ती शिरोडकर
नाटक हे सादरीकरणाचे एक चांगले कला माध्यम म्हणून ओळखले जाते. आणि त्या स्त्री कलाकारांचा वाटा खूप मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो. मराठी रंगभूमीपासून बॉलीवुड, हॉलीवूडमध्येही अनेक महिलांनी आपल्या अभिनयाने एक नवा इतिहास घडवला आहे. त्याच पद्धतीचा एक नवा इतिहास न्हावेली साखळी येथील सौम्या शैलेश शिरोडकर हिने रचलेला आहे.
नावेली साखळी येथील सौम्या शैलेश शिरोडकर हिचा जन्म १२ मार्च १९९६ साली झाला. 'शास्त्र तेज' या नाटकातून तिने पहिला प्रयोग सादर केला. बालपणापासूनच सौम्याला अभिनयाची आवड होती. तिचे वडीलही नाटकात भूमिका करायचे. सौम्याला लग्नानंतरही नाटकात भूमिका करण्याची मोठी संधी तिच्या घरच्यांनी दिली. कळीचा नारद, अयोध्येचा ध्वजदंड, गोरा कुंभार, ययाती देवयानी, मत्स्यगंधा, संशय कल्लोळ, सुवर्ण तुला, कट्चार, धाडीला राम तिने वनी, दशावतार, यमधर्म अशा नाटकांमधून शेकडो प्रयोग तिने दर्जेदार पद्धतीने सादर केले.
नाटकात भूमिका करताना मानधनची अपेक्षा कधी ठेवली नाही, असे ती सांगते. निवेदिता पुणेकर ही तिची आवडती अभिनेत्री. सोम्या हिला संत गोरा कुंभारातली भूमिका आवडते. एकदा दशावतार नाटकाचा प्रयोग असताना आजारी होती. तरिही तिने सादर केलेली भूमिका दर्जेदार झाल्याचे ती सांगते. सौम्या शैलेश शिरोडकर ही नाटकात अभिनय करते, तर तिचे पती नाटकामध्ये ताल रक्षकाचे काम अप्रतिम दर्जेदार पद्धतीने करत आहेत. शिवनाथ नाईक हे चांगले दिग्दर्शक असल्याचे सौम्या सांगते.
कलेचा विस्तार होण्यासाठी सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याने गावागावात आणि जास्त करून निदान एका घरात तरी एक कलाकार तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, असे मत सौम्या शिरोडकर हिने व्यक्त केले. नाट्यकलेतून कलाकारांचे करिअर घडू शकते. पैसा हाच माध्यम नव्हे. आपले मन असायला हवे. कलेत स्मायला शिका. नंतर आपण त्यामधून दिग्गज झालात, तर आपल्याला कलेमुळे पैसा, प्रसिद्धी मिळू शकते असे ती म्हणते. संवाद पाठांतर केल्यानंतर अगोदर शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. भूमिका कशा प्रकारची आहे, हे समजून घेतले पाहिजे. शैलेश शिरोडकर, शिवनाथ नाईक हे वेळोवेळी आपल्याला प्रोत्साहन देत असतात, असे ती आवर्जून सांगते.
अभिनयाबरोबरच आपल्याला भजनाची आवड आहे. फुगडी, मांड, गोफ वातही आपण प्राविण्य मिळवलेले आहे. मजनात अनेकवेळा आपल्याला बक्षिसे मिळाल्याची ती सांगते. आपल्या मुलांना कलेची आवड असल्यामुळे आपल्यासोबत मुली स्वरा व श्रीया या देखील तालमीला येतात. त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीचा अभिनय, तालीम करते त्यावर त्या लक्ष देतात. त्यामुळे या दोन्ही मुलींना आपला अभिनय आवडतो आणि त्याच पुढील आपला वारसा चालवतील, असा विश्वास सोन्या यांनी व्यक्त केला.
आपण एकदा संत गोरा कुंभार या नाटकात संताची भूमिका करत होती. त्यावेळी आपला मुलगा कुंभार माती मळत असताना तो चिखला जातो. त्यावेळी आपण टाहो फोडून रडते. तो क्षण भाऊक होता. त्यावेळी आपल्या मुली समोर होत्या. त्या धावून रंगमंचाच्या मागे येत आई का रडते? अशी विचारणा करत होत्या, असे सोम्या सांगते. नाटकात जर चांगली भूमिका करायची असेल तर निरीक्षण शक्ती महत्त्वाची आहे. आजूबाजूच्या स्त्रियांची देहबोली टिपणे, वेगळे निरीक्षण करणे आवश्यक आहे. रडणे-हसणे आणि राग हे आतून यायला हवे, असेही ती म्हणाली.