Santa Cruz Mangroves Destruction | सांताक्रुझ खारफुटी कत्तलप्रकरणी चौकशीचे निर्देश

Santa Cruz Mangroves Destruction | तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जुने गोवे पोलिसांकडून मागविला अहवाल
Environmental Crime
Mangroves Destruction(File Photo)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सांताक्कुझ परिसरातील कथित खारफुटीची कत्तल, पर्यावरणीय हानी आणि गुन्हेगारी निष्काळजीपणाच्या प्रकरणात जुने गोवे पोलिसांनी कोणतीही चौकशी न केल्याने तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश देत अहवाल मागविला आहे. तक्रारदार इनासिओ डॉम्निक परेरा यांनी जुने गोवे पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Environmental Crime
Goa | पूर्वेतील रोम नव्हे, दक्षिण काशी गोवा

पोलिसांनी तत्परतेने कोणतीच कारवाई न केल्याने परेरा यांनी तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे या खारफुटी कत्तलीचा प्रकार निदर्शनास आणून दिले होता. त्याची दखल घेत उपजिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. परेरा यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीत सांताक्कुझ भागातील खारफुटी जंगलाचा कथित विनाश, पर्यावरणीय नुकसान आणि संबंधित व्यक्तींच्या निष्काळजीपणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, तक्रार दाखल होऊनही पोलिसांनी कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Environmental Crime
Mamata Banerjee new dream - ममता दीदींचे नवे स्वप्न

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे परेरा कथित यांनी उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी जुने गोवे पोलिस निरीक्षकांना आवश्यक ती कारवाई करून त्वरित कारवाई केलेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. खारफुटी नाशासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना संरक्षण दिले जात असल्याची भावना निर्माण होत आहे, असे परेरा यांनी म्हटले आहे.

दोषींवर कारवाई करा : परेरा

सांताक्कुज परिसरातील खारफुटी क्षेत्र हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील मानले जाते. किनारी परिसंस्था टिकवून ठेवणे, पूरस्थिती नियंत्रणात ठेवणे आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी खारफुटीचे महत्त्व अधोरेखित केले जाते. त्यामुळे या कथित नाश प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोर्षीवर कारवाई करण्याची मागणी परेरा यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news