Salaulim Dam | दक्षिण गोव्याची चिंता मिटली! साळावली धरण 100 % भरले, अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू

Salaulim Dam | पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे जलस्रोत खात्याचे आवाहन
Goa dam
Goa dam
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या साळावली धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा असून धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात मुबलक साठा असल्याने पिण्याच्या तसेच शेतीसाठीच्या पाण्याची सध्या कोणतीही टंचाई नाही. मात्र, भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिक आणि औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जलस्रोत खात्याने केले आहे.

Goa dam
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साळावली धरणाची सामान्य साठवण पातळी ४१.१५ मीटर आहे. सध्या सतत पाण्याची आवक होत असल्याने धरणाची पाणीपातळी ४१.२८ मीटरवर पोहोचली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे बाहेर पडत आहे.

गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष धरणावर जाऊन पाहणी केली आणि पाणीपातळी व साठ्याचा आढावा घेतला.

Goa dam
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

साळावली धरणातून सुमारे ३५ किलोमीटरच्या विस्तीर्ण परिसरात नियमित पाणीपुरवठा केला जातो. पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी सध्या पिण्याच्या अथवा शेतीसाठीच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. राज्यातील अन्य जलप्रकल्पांच्या तुलनेत साळावली धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे.

मात्र, साठा मुबलक असला तरी पाण्याचा अपव्यय किंवा गैरवापर करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः सिंचनासाठी पाणी वापरणारे शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्रातील वापरकर्त्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news