Saish Naik Indian Army Selection-संघर्षावर मात करत साईश नाईकचे नेत्रदीपक यश

Saish Naik Indian Army Selection-देवळेमळ येथील युवकाची भारतीय सैन्यात निवड; गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत
अहिल्यानगर : प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पदक स्वीकारताना साईश नाईक. सोबत आई-वडील.
अहिल्यानगर : प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पदक स्वीकारताना साईश नाईक. सोबत आई-वडील.
Published on
Updated on

मडगाव : आर्थिक अडचणी आणि अपयशावर जिद्दीच्या बळावर मात करत देवळेमळ येथील साईश सुशांत नाईक याने भारतीय सैन्यात स्थान मिळविले आहे. त्याची भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित १३ आर्मर्ड रेजिमेंटमध्ये टैंक क्रू ऑपरेटर म्हणून निवड झाली असून, येत्या ५ जुलै रोजी तो राजस्थानमधील जैसलमेर येथे सेवेत रुजू होणार आहे.

अहिल्यानगर : प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पदक स्वीकारताना साईश नाईक. सोबत आई-वडील.
बेंदुर्डे-पोळे चौपदरीकरणासाठी होणार साडेसहा हजार झाडांची कत्तल

साईशचे वडील सुशांत नाईक लोह कारखान्यात काम करतात, तर आई कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत घेत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी दोघांनीही मोठे त्याग केले. याच कष्टांची परतफेड साईशने आपल्या यशातून केली आहे.

बालवाडीत असताना शाळेतील कार्यक्रमात सैनिकाचा पोशाख परिधान केल्यानंतर त्याच्या मनात भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न निर्माण झाले. देवळेमळमध्ये वाढलेल्या साईशने कुडचडे येथील गार्डियन एंजल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच शिस्त, क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीवर त्याने विशेष भर दिला. पुढे सैन्यात जाण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याने महाराष्ट्रातील आंबोली येथील सैनिक शाळेत प्रवेश घेतला. या प्रवासात कुटुंबीयांसह त्याला चुलत भाऊ कल्पेश बेलगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सन २०२४ मध्ये झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत त्याला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र त्याने हार न मानता पुन्हा तयारी सुरू केली. कुटुंबीयांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला असतानाही त्याने आणखी एक संधी मागितली आणि नव्या जोमाने सराव सुरू ठेवला. त्याने बेळगाव येथील स्वराज्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला. पहाटेच्या धावा, कठोर शारीरिक प्रशिक्षण, लेखी परीक्षेची तयारी आणि मानसिक बळ वाढविण्यासाठी केलेल्या मेहनतीमुळे त्याने लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि सामायिक प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या.

अहिल्यानगर : प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पदक स्वीकारताना साईश नाईक. सोबत आई-वडील.
अवयवदानातून सहा वर्षांत 18 जणांना जीवनदान

वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणीदरम्यानही अनेक अडथळे आले. आवश्यक कागदपत्रांसाठी त्याला पुणे, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी वारंवार जावे लागले. आर्थिक अडचणी असूनही कुटुंबीयांनी त्याची साथ सोडली नाही. अखेर त्याचे भारतीय सैन्यातील स्वप्न पूर्ण झाले. सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतल्यानंतर देवळेमळ येथे त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

आधुनिक रणगाडे, रेडिओ संप्रेषण प्रणालीची जबाबदारी

महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे त्याने दहा आठवड्यांचे मूलभूत सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ट्रेड चाचणीत यश मिळवत त्याची टँक क्रू ऑपरेटर म्हणून निवड झाली. आधुनिक रणगाडे, रेडिओ संप्रेषण प्रणाली आणि टैंक कमांड यंत्रणेशी संबंधित जबाबदाऱ्या तो सांभाळणार आहे. त्याने बेसिक टेलिकॉम प्रशिक्षणही यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news