Cash for Job scam case | सहाशे नोकर्‍यांसाठी 17 कोटींचा व्यवहार

आयएएस, वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांचा समावेश : पूजा नाईकचा गौप्यस्फोट
Cash for Job scam case
Cash for Job scam case | सहाशे नोकर्‍यांसाठी 17 कोटींचा व्यवहार
Published on
Updated on

पणजी : राज्यात गाजलेल्या कॅश फॉर जॉब घोटाळ्यात एक आयएएस व एक पीडब्ल्यूडी अधिकारी गुंतला असून एका मंत्र्याचाही त्यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट या घोटाळ्यातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने केला आहे. सुमारे 600 नोकर्‍यांसाठी या अधिकार्‍यांकडे सुमारे 17 कोटी रोख रक्कम पोहचवली आहे. ही रक्कम त्यांनी येत्या 24 तासांत परत न केल्यास असलेल्या पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांकडे त्या सर्वांचा पर्दाफाश करू, असा इशारा दिला आहे. तिच्या या इशार्‍यामुळे अनेक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

या घोटाळ्याप्रकरणी अटक होऊन जामिनावर असलेल्या आरोपी पूजा नाईक हिने एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ही सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी मध्यस्थीचे कमिशनवर काम करत होती. आतापर्यंत 17 कोटी रोख रक्कम या अधिकार्‍यांना दिली आहे. ती परत करण्यासाठी त्यांच्याकडे हेलपाटे मारत आहे मात्र अजूनही त्यांनी दिलेली नाही. सुमारे 600 जणांची रोख रक्कम तिने सरकारी नोकर्‍यांसाठी दिली आहे; मात्र त्यापैकी एकालाही नोकरी मिळालेली नाही. ज्यांची रक्कम तिने नोकरीसाठी घेतली होती, ती तिने स्वतःची मालमत्ता तसेच इतर वस्तू विकून देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही. या घोटाळ्यात मला कोणी आणले त्याचाही पर्दाफाश करणार आहे, असे तिने सांगितले. एका आयएएस अधिकारी व पीडब्ल्यूडी खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला.

जे कोणी नोकरीसाठी पैसे देण्यास तयार आहेत त्यांचे अर्ज घेऊन ये व त्यासाठी त्यांनी ठराविक रक्कम निश्चित केली होती. हा व्यवहार 2019 ते 2021 या काळात सुरू होता. 2 हजार व 500 रुपयांच्या रोख नोटांच्या स्वरुपात रक्कम घेण्यास सांगितले होते. 45 दिवसांत जर अर्जदाराला नोकरी मिळाली नाही तर पैसे परत केले जाईल, असे सांगिल्याने त्यांच्यावर विश्वास बसला. ही रोख रक्कम पर्वरीत दोन कार्यालये होती तेथे तसेच कधी पर्वरीतील मंत्रालयाच्या कार्यालयात पोहचवले जात होती. या कॅश फॉर जॉब प्रकरणात राज्यातील अनेक संशयितांना अटक झाली होती. त्यामध्ये काही सरकारी कर्मचार्‍यांचाही समावेश होता.

या प्रकरणाशी अधिकतर महिलांनी मध्यस्थीची भूमिका बजावली होती. या घोटाळ्यावरून विरोधकांनीही सरकारविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणातील एका संशयिताने जंगलात आत्महत्याही केली. या प्रकरणाचा तपासही पोलिस करत आहेत. या प्रकरणामुळे गोव्यात मोठी खळबळ उडाली होती. काही राजकीय लोकांची, नेत्यांची नावेही चर्चेत आली होती. तसेच काही सरकारी खात्यातील अधिकार्‍यांचेही धाबे दणाणले होते.

ते अधिकारी अजूनही सेवेत...

आयएएस व तो वरिष्ठ अधिकारी अजूनही सरकारी सेवेत आहेत. नोकरीसाठी पैसे दिलेल्यांनी माझ्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने काहींचे पैसे माझ्याकडील वस्तू विकून दिले आहेत. या अधिकार्‍यांकडे पैसे परत करण्यासाठी वारंवार हेलपाटे मारत आहे मात्र ते अजूनही देत नाहीत. फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे येत्या

24 तासांत त्यांनी हालचाली केल्या नाहीत तर या अधिकार्‍यांसह मंत्र्याच्या नावाचाही पर्दाफाश करणार असल्याचे पूजा नाईक हिने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news