Goa Elections Politics | गोव्यात भाजपला धक्का बसणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची एकनाथ शिंदेंशी भेट

Goa Elections Politics | रॉय नाईक शिवसेनेच्या वाटेवर; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गोव्याच्या राजकारणात चर्चा
Goa Elections Politics
Goa Elections Politics
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

माजी मंत्री व शिरोडाचे दोन वेळचे आमदार महादेव नाईक व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे कनिष्ठ सुपुत्र रॉय रवी नाईक हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी शनिवारी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

Goa Elections Politics
IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

रॉय नाईक हे मडकई मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. मात्र भारतीय जनता पक्ष त्यांचे भाऊ रितेश नाईक यांना फोंड्यात उमेदवारी देऊ शकतात. दोन भावांना एकाच वेळी भाजप उमेदवारी देणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्यामुळे त्यांनी आता पर्याय निवडायला सुरुवात केली आहे. फोंडा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. मात्र त्यांनी हल्लीच नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला असून, राजकीय क्षेत्रात उडी मारण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आधार घेण्याच्या बेतात आहेत.

दुसरीकडे माजी मंत्री महादेव नाईक यांनी शिरोडातून दोनवेळा भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळवला होता. मात्र सुभाष शिरोडकर हे भाजपात दाखल झाले. २०२२ मध्ये त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे महादेव नाईक हे आपच्या उमेदवारीवर लढले. मात्र निवडणुकीत सुभाष शिरोडकर यांनी त्यांचा पराभव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.