Rohan Khaunte | सोळा वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरांवर येणार निर्बंध? पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचे मोठे विधान

Rohan Khaunte | पर्यटन मंत्री रोहन खंवटे : केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी चर्चा करणार
Rohan khawante
Rohan khawante
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकार सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया पूर्णपणे बंद करण्याबाबत नव्हे, तर निर्बंध घालण्याबाबत विचार करत आहे. याविषयी आम्ही यापूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. पुढील दिवसात दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची आपण भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार आहे. अनेक देशांनी याबाबत पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन पर्यटन व माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी केले.

Rohan khawante
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

दोनापावल येथे गुरुवारी एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी खंवटे बोलत होते.
खंवटे म्हणाले की, एका अभ्यासानुसार देशात सोळा वर्षांखालील एक मुलगा दिवसाचे दीड ते दोन तास मोबाईलवर घालवतो. त्यामुळे समाज माध्यम आणि काही गेम्सवर निर्बंध घालणे आवश्यकच आहे.

सोळा वर्षांखालील मुलांनी तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींचे ज्ञान घेण्यासाठी केला पाहिजे. त्यांनी गुगल किंवा एआय टूल्सचा वापर करावा. यासाठी माहिती व तंत्रज्ञान खात्यातर्फे देखील प्रोत्साहन दिले जाते. लहान मुलांनी सोशल मीडियाचा वापर रील पाहणे, गेम्स खेळणे यासाठी करू नये असे आम्हाला वाटते.

Rohan khawante
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मोबाईल फोन दिला नाही म्हणून एका लहान मुलाने आत्महत्या केली. देशभरात अशा विविध घटना होत आहेत. अशा घटना गंभीर बाब आहे. याचा पालकांनीदेखील विचार केला पाहिजे.
मुलांनी सोळा वर्षांपर्यंत शैक्षणिक टूल्स वापरणे आवश्यक आहे. मुलांनी करिअरसाठी एआय, नवतंत्रज्ञान शिकण्यास प्राधान्य द्यावे. गेमिंग ॲप वापरावर पूर्ण बंदी न घालता काही प्रमाणात प्रतिबंध घालणे अत्यंत गरजेचे असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news