Revolutionary Goans Party | आरजीपीमध्ये मोठी कारवाई; खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Revolutionary Goans Party | पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई
Revolutionary Goans Party | आरजीपीमध्ये मोठी कारवाई; खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि खजिनदार अजय खोलकर यांची प्राथमिक सदस्यत्वावरून तात्काळ प्रभावाने हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप सिद्ध झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी शिस्तपालन समितीच्या शिफारशीनुसार ही कारवाई केली.

Revolutionary Goans Party | आरजीपीमध्ये मोठी कारवाई; खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

प्रवीण हळदणकर यांच्या अध्यक्षतेखालील आरजीपी शिस्तपालन समितीने सादर केलेल्या सविस्तर अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, खोलकर यांनी पक्षाच्या अधिकारांचा अयोग्य वापर केला, वित्तीय अनियमितता केली तसेच पक्षाची महत्त्वाची कागदपत्रे हटवली.

पक्ष नेतृत्वावर वारंवार सार्वजनिक पातळीवर टीका करणे, अनधिकृत पत्रव्यवहार करणे आणि सोशल मीडियाद्वारे पक्षाविरोधात वातावरण निर्माण करून संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Revolutionary Goans Party | आरजीपीमध्ये मोठी कारवाई; खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

आरजीच्या शिस्तपालन समितीने खोलकर यांना आपली बाजू मांडण्यासाठी आणि कायदेशीर प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी पूर्ण संधी दिली होती; मात्र त्यांनी या संधीचा वापर केला नाही. या हकालपट्टीनंतर अजय खोलकर यांना आरजीपीच्या वतीने कोणतेही प्रतिनिधित्व करण्याचे किंवा वक्तव्य करण्याचे अधिकार नसतील. शिवाय, पक्षाची कागदपत्रे चोरणे, फसवणूक आणि मानहानीप्रकरणी खोलकर यांच्यावर कायदेशीर आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस शिस्तपालन समितीने केली आहे.

व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा : वीरेश बोरकर

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार वीरेश बोरकर या संदर्भात बोलताना म्हणाले की, पक्षाची शिस्त, आर्थिक पारदर्शकता आणि संघटनेची अखंडता यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पक्षाच्या घटनेपेक्षा आणि हितसंबंधांपेक्षा कोणताही पदाधिकारी मोठा असू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news