Viresh Borker | झारखंड दिन सोहळ्यास आरजीचा विरोध

Viresh Borker | गतवर्षीच्या हाणामारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सांतआंद्रे मतदारसंघातील आगशी येथे होणाऱ्या झारखंड दिन सोहळ्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी आरजीने केली आहे.
RG MLA Viresh Borkar
RG MLA Viresh Borkar
Published on: 
Updated on: 

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

गतवर्षी कार्यक्रमावेळी झालेली मारामारीची घटना विचारात घेत सरकारने सांतआंद्रे मतदारसंघातील आगशी येथे २२ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या झारखंड दिन सोहळ्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी आरजीच्या वतीने उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनी बुधवारी करण्यात आली आहे.

RG MLA Viresh Borkar
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्यासह आरजीच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर करत जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. याबाबत बोरकर म्हणाले की, २२ नोव्हेंबर रोजी सांतआंद्रे मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या झारखंड दिन साजरा करण्यास परवानगी देऊ नये ही आमची मागणी आहे. मागील वर्षी सोहळा आयोजित करण्यासाठी ५ हजार लोक जमणार असे सांगून परवानगी घेण्यात आली होती.

RG MLA Viresh Borkar
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

प्रत्यक्षात मात्र, १५ हजारांहून अधिक लोक जमले होते. त्यानंतर तिथे झालेल्या हाणामारीच्या घटनेमुळे स्थानिकांना मात्र, घाबरून घरात लपून बसावे लागते. आयोजकांचे म्हणणे आहे की, जर या सोहळ्याला कोणी विरोध केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली जात आहे.

झारखंडमधील भाजप पदाधिकारी हा सोहळा आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्री, माजी आमदार, संभाव्य इच्छुक भाजप उमेदवार आदींच्या गाठीभेटी घेत आहेत. याला स्थानिक पंच सदस्यांनी विरोध केलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.