

पणजी : बिहारचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची आता केरळच्या 23व्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रपती कार्यालयाने जारी केले आहे.
राजेंद्र आर्लेकर 2002 ते 2007 पर्यंत आणि 2012 ते 2017 पर्यंत गोवा विधानसभेचे सदस्य होते. याच दरम्यान त्यांनी 2012 ते 15 दरम्यान विधानसभेचे सभापतिपद भूषवले असून 2015 ते 2017 पर्यंत पंचायत आणि वन मंत्रालयाचा कारभार पाहिला आहे. याबरोबरच 31 जुलै 2021 ते 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. 17 फेब्रुवारी 2023 नंतर त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांची केरळ येथे बदली करण्यात आली आहे.