
पणजी : नौदलाच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी 7 रोजी गोवा भेटीवर येत आहेत. खासगी विमानाने राष्ट्रपती मुर्मू भारतीय नौदलाच्या ’आयएनएस हंसा’ तळावर येतील.
सकाळी 10.30 वाजता नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, आयएनएस हंसावर (गोवा येथील नौदल हवाई स्टेशन) राष्ट्रपतींचे स्वागत करतील आणि 150 जणांचा सेरेमोनियल गार्ड ऑफ ऑनर प्रदान करतील. त्यानंतर राष्ट्रपती स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर जातील. मुर्मू यांचे बहु-डोमेन नौदल ऑपरेशन्सच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचे साक्षीदार होण्यासाठी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे हे पहिले नौकानयन आहे. नियोजित ऑपरेशन्समध्ये पृष्ठभागावरील जहाजांचे ऑपरेशन्स, युद्धाच्या क्रिया, पाणबुडीचे सराव, डेक-आधारित लढाऊ विमान, हेलिकॉप्टरद्वारे उड्डाण आणि लँडिंग आणि नौदलाच्या विमानांद्वारे फ्लायपास्टसह एअर पॉवर डेमो यांचा समावेश आहे. संध्याकाळी त्या पुन्हा गोव्यात येऊन नंतर दिल्लीला रवाना होतील.