Goa - रंगभूमीशी अतूट नाते जोडणाऱ्या प्रज्ञा पार्सेकर

रंगभूमीशी अतूट नाते जोडणाऱ्या प्रज्ञा पार्सेकर
प्रज्ञा पार्सेकर
प्रज्ञा पार्सेकर
Published on: 
Updated on: 

रंगयात्रा- निवृत्ती शिरोडकर

नपणापासूनच कलेची आणि बा अभिनयाची आवड माझ्या मनात रुजली होती. शिक्षण घेत असताना नाटकाविषयीची ओढ अधिकच वाढत गेली. रंगमंचावर कलाकारांना विविध व्यक्तिरेखा साकारताना पाहून आपणही अभिनय करावा, वेगवेगळ्या भूमिका जगाव्यात आणि आपल्या कलेतून प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचावे, अशी इच्छा मनात निर्माण झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही ही आवड कायम राहिली. याच आवडीतून आणि काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेतून माझ्या नाट्यप्रवासाला सुरुवात झाली, असे प्रज्ञा गंगाराम पार्सेकर सांगतात.

प्रज्ञा पार्सेकर
Goa MGP focus on 3 constituencies| तीन मतदारसंघांवर मगोचे लक्ष केंद्रित

पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवताना मनात उत्सुकता होती; त्याचबरोबर थोडी भीतीही होती. संवाद नीट बोलता येतील का, भूमिका प्रेक्षकांना आवडेल का, रंगमंचावर आत्मविश्वासाने वावरता येईल का, असे अनेक प्रश्न मनात होते. मात्र, प्रत्यक्ष प्रयोगाचा अनुभव घेतल्यानंतर हळूहळू ही भीती कमी झाली. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि सहकलाकारांकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे आत्मविश्वास वाढत गेला. अभिनयाचे औपचारिक प्रशिक्षण घेतले नसले, तरी तालमी, प्रत्यक्ष प्रयोग आणि अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन यातून शिकण्याची संधी मिळाली. प्रत्येक भूमिकेने अभिनयाचा नवा पैलू उलगडून दाखवला.

प्रज्ञा पार्सेकर
Goa MGP BJP Alliance 2026 | मगोचे यश भाजप सोबतच्या युतीवर अवलंबून

या प्रवासात सोमनाथ पार्सेकर यांचे मार्गदर्शन विशेष महत्त्वाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'संगीत पंढरपूर', 'भाव तोचि देव', 'एकच प्याला' आणि 'संगीत शारदा' या नाटकांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकांमधून अभिनयातील विविधता अनुभवता आली. संवादफेक, आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि प्रसंगानुरूप भावना व्यक्त करण्याचे बारकावे शिकता आले. प्रत्येक नाटकाची भाषा, आशय आणि व्यक्तिरेखांचे भावविश्व वेगळे असल्याने त्यानुसार स्वतःला घडवावे लागले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अभिनयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची दृष्टी मिळाली.

सुरुवातीला छोट्या भूमिका साकारताना मिळालेला अनुभव पुढे मोठ्या भूमिका करताना उपयोगी पडला. भूमिकेची लांबी कितीही असली, तरी तिचे महत्त्व समजून घेऊन ती प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न केला. नाटकात केवळ स्वतःची भूमिका चांगली करणे पुरेसे नसते, तर संपूर्ण प्रयोगाचा विचार करावा लागतो. सहकलाकारांचे निरीक्षण करणे, तालमींमध्ये चुका सुधारणे, दिग्दर्शकांच्या सूचना समजून घेणे आणि प्रत्येक प्रयोगातून काहीतरी नवीन शिकणे, या प्रक्रियेतून माझी जडणघडण होत गेली. अभिनय ही सतत शिकत राहण्याची कला आहे, याची जाणीव अधिक दृढ झाली.

जयेंद्रनाथ हळदणकर आणि सुनील आसोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य प्र. के. अत्रे लिखित 'तो मी नव्हेच!' या गाजलेल्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातील 'गंगूताई घोटाळे' ही भूमिका माझ्या नाट्यप्रवासातील विशेष जिव्हाळ्याची ठरली विनोदी व्यक्तिरेखा साकारताना केवळ संवादांवर अवलंबून राहता येत नाही. पात्राची बोलण्याची पद्धत, देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव आणि प्रसंगानुसार बदलणाऱ्या भावना यांचा योग्य मेळ साधावा लागतो. गंगूताईचे व्यक्तिमत्त्व समजून घेताना या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागले.

गंगूताई घोटाळे ही भूमिका साकारताना प्रत्येक प्रयोगात काहीतरी नवे अनुभवायला मिळाले. विनोदी प्रसंगातील योग्य वेळ, संवादांची लय आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया यांना विशेष महत्त्व असते. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य आणि संवादानंतर मिळणाऱ्या टाळ्यांची दाद कलाकाराला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते. ही भूमिका साकारताना विनोदनिर्मितीतील बारकावे समजले. त्याचबरोबर प्रेक्षकांशी थेट नाते जोडण्याची संधी मिळाली. त्यामुळे 'गंगूताई घोटाळे' ही व्यक्तिरेखा माझ्या कायम स्मरणात राहील.

सुनील आसोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'शिववर्धन' या नाटकात बाणासुराची भूमिका साकारण्याची संधीही मिळाली. ही भूमिका आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक होती. व्यक्तिरेखेचा प्रभाव रंगमंचावर उभा करण्यासाठी आवाज, हालचाली, देहबोली आणि भावाभिव्यक्ती यांवर मेहनत घ्यावी लागली. पात्राच्या स्वभावानुसार रंगमंचावरील वावर आणि संवाद सादर करण्याची पद्धत ठरवावी लागते. या भूमिकेमुळे अभिनयातील वेगळ्या शक्यता अनुभवता आल्या आणि स्वतःच्या क्षमतांकडे नव्याने पाहण्याची संधी मिळाली.

नाट्यप्रवासात अभिनयाइतकेच महत्त्व तालींना असते. प्रयोग यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कलाकाराने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक असते. संवाद पाठ करणे, प्रसंगांचा सराव करणे, सहकलाकारांशी योग्य समन्वय राखणे आणि दिग्दर्शकांच्या सूचनांनुसार बदल करणे, या सगळ्यांतून शिस्त निर्माण होते. प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान कधी संवाद चुकतो, तर कधी राखून सहकलाकारांच्या मदतीने प्रयोग पुढे नेणे महत्त्वाचे असते. या अनुभवांतून कलाकार अधिक संयमी आणि सक्षम बनतो.

ग्रामीण भागातील स्त्री कलाकार म्हणून नाटक करताना काही अडचणींचाही सामना करावा लागतो. तालमी, प्रयोग, प्रवास आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधणे नेहमीच सोपे नसते. घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून कलेसाठी वेळ देणे, रात्रीच्या तालमींना उपस्थित राहणे आणि प्रयोगांसाठी प्रवासाचे नियोजन करणे, यासाठी जिद्द आणि चिकाटी आवश्यक असते. समाजाचा दृष्टिकोन आणि उपलब्ध सुविधांचाही कलाकारांच्या प्रवासावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत कुटुंबाचे सहकार्य आणि स्वतःवरील विश्वास यांमुळे पुढे जाण्याचे बळ मिळते.

पूर्वी ग्रामीण समाजात स्त्रियांनी नाटकात काम करण्याकडे काही प्रमाणात संकोचाने पाहिले जात असे. मात्र, आता या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होताना दिसतो. मुलींना आणि महिलांना कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तरीही ग्रामीण भागातील स्त्री कलाकारांना अधिक संधी, प्रशिक्षण आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यांच्यातील कलागुणांना योग्य संधी मिळाल्यास त्या नाट्यविश्वात स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. ग्रामीण रंगभूमी अधिक समृद्ध करण्यासाठी अशा कलाकारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

आज समाजमाध्यमे आणि डिजिटल मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली, तरी प्रत्यक्ष रंगमंचावर कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात निर्माण होणारे नाते वेगळेच असते. प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद कलाकाराला नवी ऊर्जा देतो. प्रयोग संपल्यानंतर मिळणारी दाद ही पुढील प्रयोगासाठी प्रेरणा ठरते. ग्रामीण भागातील नाट्यसंस्कृती टिकून राहावी, यासाठी अधिक नाट्यस्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि नाट्यप्रयोग आयोजित व्हावेत, अशी मनापासून इच्छा आहे. रंगभूमीने मला केवळ अभिनयाची संधी दिली नाही, तर आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि स्वतःला व्यक्त करण्याची ताकदही दिली, असे त्या सांगतात.

रंगदेवतेची सेवा करीत राहणार...

माझ्यासाठी नाट्यप्रवास म्हणजे मेहनत, संघर्ष, सहकलाकारांची साथ, जपलेल्या आठवणी आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची कहाणी आहे. या प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती, मिळालेल्या भूमिका आणि प्रत्येक प्रयोगाने मला घडवले. रंगभूमीने माझ्या आयुष्याला दिशा दिली आणि स्वतःकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. याच कृतज्ञतेने पुढेही नवनवीन गोष्टी शिकत, अभिनयाचा आनंद घेत आणि रंगदेवतेची सेवा करत राहण्याची माझी इच्छा आहे, असेही प्रज्ञा पार्सेकर सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news