Porvorim Shooting Case | पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! गोपाळ नाईकच मुख्य 'मास्टरमाइंड' असल्याचा पोलिसांना संशय

Porvorim Shooting Case | पर्वरी गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या कटातील संशयाने शोध सुरू
shooting case
shooting casePudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथील गोळीबार प्रकरणाच्या तपासात नवा ट्विस्ट समोर आला आहे. गोपाळ नाईक हा या गोळीबाराचा कथित 'मास्टरमाइंड' असल्याचा संशय आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. गोपाळ नाईक याचे कॅसिनो उद्योगाशी संबंध असून, काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशीही त्याचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

shooting case
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

या पार्श्वभूमीवर पर्वरी गोळीबाराच्या कटामागे त्याची भूमिका आहे काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस सध्या गोपाळ नाईकच्या शोधात असून, त्याचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी तपास यंत्रणा विविध दिशांनी चौकशी करत आहे. गोळीबारासाठी आरोपींना कोणी निर्देश दिले, त्यामागील कारण काय होते आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, याच प्रकरणात एका आरोपीचे कथित वकील म्हणून समोर आलेल्या ॲड. अनिता यांनी यापूर्वी केलेल्या दाव्याबाबत यू-टर्न घेतला आहे. त्यांनी नव्या व्हिडिओद्वारे आधी शेअर केलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे मान्य करत माफी मागितली आहे. मात्र, गोपाळ नाईक यांची 'मास्टरमाइंड' म्हणून भूमिका अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नसून, हा पोलिस तपासातील संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news