Porvorim Flyover Speed Limit | पर्वरी उड्डाणपुलावर स्पीड कॅमेऱ्यांची करडी नजर! 10 दिवसांत 580 वाहनचालकांना ठोठावला दंड

Porvorim Flyover Speed Limit | पर्वरी उड्डाणपुलाची किमया : मृतांना मात्र भरपाई नाही
AI Cameras Security
AI Cameras SecurityPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथील उड्डाणपुलावर ६५ पेक्षा अधिक वेगाने वाहन चालवत असाल, तर सावधान! स्पीड कॅमेरे आणि वाहतूक पोलिसांची नजर तुमच्यावर असून, वाहनमालकाच्या मोबाईलवर वाहतूक नियमभंग केल्याबद्दल चलन येणार आहे. त्यामुळे वाहने निर्धारित वेगात चालवा, स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या.

AI Cameras Security
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

पर्वरी येथील उड्डाणपुलावर अतिवेगाने वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. स्पीड कॅमेरे बसवल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ५८० वाहने ओळखली गेली असून, वाहनमालकांना एसएमएसद्वारे सूचना पाठवून चलन जारी करण्यात येत आहे.

उड्डाणपूल ११ सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आतापर्यंत चार अपघात झाले आहेत. त्यापैकी १३ सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी तीन अपघात झाले; मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उड्डाणपुलावर ताशी ६५ किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अपघातांची मालिका सुरू असतानाही काही वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. वेगमर्यादेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी स्पीड कॅमेऱ्यांसह पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

पहिल्या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी दोन स्पीड कॅमेरे बसवण्यात आले. तसेच अटल सेतूकडून पर्वरीच्या दिशेने उतरणाऱ्या मार्गावर आणखी एक कॅमेरा बसवण्यात आला आहे.

AI Cameras Security
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

वाहनांच्या मालकांना मोबाईलवर 'एसएमएस':


स्पीड कॅमेरे कार्यान्वित झाल्यापासून २५ सप्टेंबरपर्यंत ५८० वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करताना आढळली. संबंधित वाहनांच्या मालकांना मोबाईलवर एसएमएस पाठवण्यात आले असून, त्यांच्याविरोधात चलनाची प्रक्रिया सुरू आहे. उड्डाणपुलावर सुरक्षित वेगाने वाहन चालवावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news