Goa Crime Branch Gopal Naik | साधूचा वेष परिधान करून पळणारा मुख्य सूत्रधार गोपाळ नाईक जेरबंद; गोवा क्राईम ब्राँचची धडक कारवाई

Goa Crime Branch Gopal Naik | साधूच्या वेषात गोव्याबाहेर पळण्याचा प्रयत्न क्राईम ब्राँचने उधळला
Goa Crime Branch Gopal Naik
Goa Crime Branch Gopal Naikfile
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्वरी येथील निओ मॅजिस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर हॉटेलबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित गोपाळ नाईक (कुंडई) याच्या मोले तपासनाक्यावरून वाहनातून साधूच्या वेषात पळण्याच्या प्रयत्नात असताना क्राईम ब्राँचने चतुराईने त्याच्या बुधवारी मध्यरात्री कुळे येथून मुसक्या आवळल्या. त्याला पलायनास मदत केलेला साथीदार सुशांत हरिजन व वाहन चालक रामदास मिराशी यांनाही अटक केली आहे.

Goa Crime Branch Gopal Naik
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

गोळीबाराच्या घटनेनंतर गोपाळ नाईक पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून सतत ठिकाणे बदलत होता. बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि जगन्नाथ पुरी अशा विविध शहरांमध्ये आश्रय घेतल्यानंतर तो पुन्हा गोव्यात दाखल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राज्यातील पोलिस स्थानके, तसेच सीमावर्ती तपास नाक्यांवर सतर्कता वाढवली होती.

मोले तपासनाक्यावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. वाहनाची तपासणी करताना व त्यांची चौकशी करताना तिघांकडून दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली. त्यामुळे साधूच्या वेषात वाहनाच्या मागील आसनावर बसलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता तो गोपाळ नाईक असल्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Goa Crime Branch Gopal Naik
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या मुख्यालयात आणण्यात आले आहे. गोपाळ नाईक याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या दोघ साथीदारांची पर्वरी गोळीबार प्रकरणात नेमकी काय भूमिका होती, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सतीश शिंदेच्या जबाबातून नाईकचा सहभाग उघड:

गोळीबार घटनेप्रकरणी बोरीवलीस्थित व कॅसिनो जुगार व्यवसायाशी संबंध असलेल्या यापूर्वी अटक केलेल्या सतीश शिंदे याची पोलिस कोठडीत चौकशी सुरू असताना गोपाळ नाईकच्या सहभागाची माहिती समोर आली होती. शिंदेच्या जबाबासोबतच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेने नाईकचा शोध सुरू केला होता. गोळीबाराच्या घटनेत गोपाळ नाईकची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. अखेर तो गोव्यात परतत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. वेषांतर करून राज्याबाहेर पसार होण्याचा नाईकचा प्रयत्न गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला व त्याला जेरबंद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news