

पणजी : पुढारी वृत्तसेवा
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे, त्यामुळे पुढील दोन महिने राजकीय पक्षांच्या युती, आघाड्या व निवडणूक प्रचार याचे आहेत. एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि मगो या सत्ताधारी पक्षांची युती कायम राहणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सांगत असले तरी मगो पक्षाच्या जादा जागांच्या मागणीमुळे युतीत तणाव निर्माण होताना दिसत आहे.
दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष काँग्रेसने अद्याप सहकारी पक्षांसोबत जागांच्या वाटणीची बोलणी सुरू न केल्याने काँग्रेस आघाडीच्या सोबती आरजी व गोवा फॉरवर्ड निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आपने काही दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्ड सोबत युती केली होती.
मात्र, फॉरवर्ड आता आपली साथ सोडून काँग्रेस सोबत आघाडी स्थापनाची इच्छा व्यक्त करत आहे. त्यामुळे आप स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे सत्ताधारी भाजप मगोमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षातली मध्ये अद्याप युतीची बोलणी सुरू झालेली नाहीत, त्यामुळे त्यांच्यातही तणाव आहे.
एक आमदार असलेला आरजी पक्ष १२ जागांची मागणी करत असल्यामुळे काँग्रेस नेते अंबित झाले आहेत. फॉरवर्डनेही ८ जागा मागितल्या असून त्यातील काही काँग्रेसला लढवण्याच्या आहेत. मात्र फॉरवर्ड कमी जागा घेण्यास तयार होण्याची शक्यता आहे. कारण या पक्षाला फातोड्यात काँग्रेसचा उमेदवार नको आहे.
भाजपचे सध्या २५ आमदार आहेत, तर फोंडा व ताळगाव येथील भाजप आमदारांचे निधन झालेले असले तरी दोन जागा भाजपच्या आहेत. अशा स्थितीत दोन आमदार असलेला मगो पक्ष सात जागांची मागणी करत असून त्यापैकी भाजप २२ जागा जिंकलेल्या फोंडा व पेडणे या दोन जागांसह मंत्री सुभाष शिरोडकर आमदार असलेला शिरोडा मतदार संघ आपल्या मागण्यांवर कायम राहिला, तर मगो व भाजप युती तुटण्याची शक्यता दिसते.
मगोचे अध्यक्ष दीपक धवळीकर यांनी शिरोड्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे सहकारमंत्री सुभाश शिरोडकर नाराज झाले आहेत. त्यांनी धवळीकर यांनी दुसऱ्यांदा हरवण्यासाठी शिरोड्यातून लढावे असे म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात तणाव वाढला. मगोचे अध्यक्ष दीपक धवळीकर यांनी शिरोड्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे सहकारमंत्री सुभाश शिरोडकर नाराज झाले आहेत.
काही नेते अपेक्षा व्यक्त करत असले, तरी निवडणुकीसाठी जागा वाटप हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. येत्या निवडणुकीत भाजप व मगो यांच्यात युती होणार हे नक्की आहे. जागांचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केली.