CM Pramod Sawant | निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करून महिला बदला घेतील: डॉ. प्रमोद सावंत

Panaji Women's Protest | पणजीत महिलांचा आक्रोश मोर्चा; महिला आरक्षणावरून काँग्रेसवर टीकेची झोड
Congress vs BJP Goa Women's Issues
भाजपा महिला मोर्चा तर्फे पणजीत आयोजित काँग्रेसचा निषेध मोर्चाला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सोबत प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, आमदार डॉ. देविया राणे, डिलालयाल लोबो, सुवर्णा तेंडुलकरPudhari
Published on
Updated on

Congress vs BJP Goa Women's Issues

पणजी : महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देणाऱ्या ‘नारी शक्ती वंदना’ विधेयकाला विरोध केल्याचा आरोप करत भाजप महिला मोर्चाच्या वतीने पणजी येथे काँग्रेसविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता.

मोर्चापूर्वी भाजप कार्यालयासमोर आयोजित सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. महिलांना मिळणाऱ्या ३३ टक्के आरक्षणाला विरोध करून काँग्रेसने त्यांचा हक्क हिरावून घेतला असून हा महिलांचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. या अन्यायाचा बदला देशातील आणि गोव्यातील महिला आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभूत करून घेतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Congress vs BJP Goa Women's Issues
Women Reservation Bill : विधेयक लोकसभेत पडलं... तरी 'महिला आरक्षण' २०२९ मध्ये लागू होऊ शकतं; जाणून घ्या कायदेशीर पर्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आणि राजकारणात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हे विधेयक आणल्याचे सांगत डॉ. सावंत यांनी केंद्र सरकारच्या महिला-केंद्रित योजनांची माहिती दिली. २०१४ नंतर केंद्राच्या अनेक योजनांना काँग्रेसने विरोध केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ३३ टक्के आरक्षण ही महिलांसाठी मोठी संधी होती, मात्र काँग्रेसने ती नाकारल्याचे सांगितले. भाजप महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Congress vs BJP Goa Women's Issues
Women Reservation | उंच तिचा झोका...

आमदार डॉ. देविया राणे यांनी काँग्रेसला महिलांचे सशक्तीकरण मान्य नसल्याचा आरोप केला. महिलांनी जागरूक राहून काँग्रेसला निवडणुकांत धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार डिलायला लोबो यांनीही विरोधकांवर टीका करत महिलांना आरक्षण देण्यास अडथळा आणल्याचे म्हटले.

महिला मोर्चा प्रभारी प्रा. सुलक्षणा सावंत यांनी विरोधकांनी नियोजनपूर्वक हे विधेयक अडविल्याचा आरोप केला. भविष्यात महिलांच्या पाठिंब्यामुळे भाजपला मोठे यश मिळेल आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Congress vs BJP Goa Women's Issues
Women Reservation Reality : महिला आरक्षण फक्त कागदोपत्रीच राहणार का?

या प्रसंगी महिला मोर्चा अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, उत्तर गोवा जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा बांदोडकर, सदस्य गौरी कामत, निहारिका मांद्रेकर, कुंदा चोडणकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news