Goa POCSO Court | लैंगिक अत्याचारप्रकरणी वडिलांची निर्दोष मुक्तता

Goa POCSO Court | खोटी तक्रार दिल्याची पीडित मुलीची साक्षीवेळी कबुली
Court News
Court NewsPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ३८ वर्षीय मुलीच्या वडिलांची पणजी येथील विशेष पोक्सो न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुलीने न्यायालयात खोटी तक्रार दिल्याची कबुली दिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला.

Court News
Sindhudurg News : पावणेतीन लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त

पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनुसार पर्वरी पोलिसांनी तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सुनावणीदरम्यान अल्पवयीन मुलीने न्यायालयात दिलेल्या साक्षीत, आपण रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार दाखल केली होती, असे सांगितले. या साक्षीसह उपलब्ध पुराव्यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नसल्याचे नमूद केले.

Court News
Goa Charter Tourism Season | चार्टर पर्यटन हंगामासाठी गोवा सज्ज

फौजदारी खटल्यात आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी अभियोक्त्याची असते. मात्र, या प्रकरणात पुराव्यांचा अभाव आणि फिर्यादीच्या साक्षीतील बदल लक्षात घेता आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे विशेष पोक्सो न्यायालयाने संबंधित व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news