Panjim Traffic Problems | पणजीत आता खासगी कार्यक्रमांना परवानगी नाही; वाहतूक समस्येमुळे महापालिकेचा मोठा निर्णय

Panjim Traffic Problems | पर्यटकांची वाढती गर्दी आणि पणजी शहरात वारंवार होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांमुळे पणजीतील वाहतूक व्यवस्था कोलमडू लागली आहे.
Goa traffic news
Goa traffic news
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्यटकांची वाढती गर्दी आणि पणजी शहरात वारंवार होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांमुळे पणजीतील वाहतूक व्यवस्था कोलमडू लागली आहे. त्यामुळे पणजी महापालिकेने शहरात खासगी कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा ठराव घेतला आहे. मोठ्या संख्येने नागरिक व पर्यटक एकत्र येणाऱ्या कार्यक्रमांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Goa traffic news
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

विशेषतः शनिवार-रविवारी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना घर गाठण्यासाठी तासन् तास अडकून पडावे लागत आहे. बांदोडकर मैदानावर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमानंतर वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हा प्रश्न पणजी महापालिकेच्या बैठकीत त्या प्रभागातील नगरसेवकांनी उपस्थित करून परवानगी देणे महापालिकेने बंद करण्याची मागणी केली होती. पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनीही शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली.

Goa traffic news
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

पणजीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकारला पाच महिन्यांची मुदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल यांसारखे मोठे कार्यक्रम आगामी काळात पणजीत होणार आहेत. या कार्यक्रमांच्या काळात शहरात पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची वाहतूक व्यवस्था आणखी विस्कळीत होण्याची भीती पणजीतील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.