Goa Digital Arrest Cyber Fraud | पणजीत ९०.८५ लाखांचा गंडा; संशयिताच्या मुसक्या आवळल्या

सायबर पोलिसांच्या पथकाने केरळमधून घेतले संशयिताला ताब्यात
Digital Arrest Cyber Fraud
Digital Arrest Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पणजी : ट्राय आणि सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवून पणजीतील एकाला डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ९० लाख ८५ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांच्या पथकाने एका संशयिताच्या केरळमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या. मुहम्मद रसिक अलावी पुलिक्कल (वय २१, रा. - मलप्पुरम, केरळ) असे अटक केलेल्या सायबर भामट्याचे नाव आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संशयिताने २३ फेब्रुवारी २०२६ पूर्वीच्या कालावधीत, तक्रारदाराशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), मुंबई येथील अधिकारी असल्याचे भासवले. एका प्रसिद्ध व्यक्तीसोबतच्या मनी लाँडरिंग (पैशांची अफरातफर) प्रकरणात सहभाग असल्याचा आणि त्या व्यक्तीकडून कमिशन घेतल्याचा आरोप करत त्याला धमकावले. संशयिताने बेकायदेशीररीत्या तक्रारदाराला डिजिटल अटक केली आणि या कथित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी एकूण ९०,८५,००० रुपये खात्यामध्ये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. यावेळी संशयित केरळमध्ये असल्याचे उघड झाले.

पोलीस उपनिरीक्षक नवीन नाईक, पोलीस कॉन्स्टेबल यश कोले व सिहारमय्या माथ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केरळला जाऊन ही कारवाई केली. साहाय्यक पोलीस अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या देखरेखीखाली आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राजू राऊत-देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news