Panaji Campal Lake | पणजीत पुन्हा जलप्रदूषणाचा धक्का! कांपाल लेकव्ह्यू कॉलनीतील तलावात हजारो माशांचा गूढ मृत्यू

Panaji Campal Lake | पाण्याच्या नमुन्याची चौकशीची मागणी; दुर्गंधीमुळे प्रकार उघड
दूषित पाण्याने तलावात माशांचा मृत्यू
दूषित पाण्याने तलावात माशांचा मृत्यू
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजीतील कांपाल लेकव्ह्यू कॉलनी परिसरातील तलावात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याची घटना समोर आली आहे. या तलावातील पाण्यालाही दुर्गंधी येत असल्याने या घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी तेथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

दूषित पाण्याने तलावात माशांचा मृत्यू
Ratnagiri Drowning Incident : धामणंद येथे डोहात बुडून तिघांचा मृत्यू

काही आठवड्यांपूर्वी मळा परिसरात अशाच प्रकारची घटना घडल्यानंतर आता कांपाल येथील तलावात तसाच प्रकार आढळून आला आहे. या घटनेमुळे तेथील स्थानकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या तलावातील पाण्याचे नमुने तपासण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.

प्रदूषण, सांडपाण्याचा प्रवेश किंवा पाण्यातील प्राणवायूची कमतरता ही या मासे मृत्यूमागील संभाव्य कारणे असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील जलस्रोतांच्या स्वच्छतेबाबत आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या तपास अहवालाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दूषित पाण्याने तलावात माशांचा मृत्यू
Jalgaon news | पाळधीचा महामार्ग की मृत्यूचा सापळा? भरधाव वेगाने घेतला एकाचा बळी

गुणवत्तेची सखोल चौकशी करा

प्रदूषण, सांडपाण्याचा प्रवाह, पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूची कमी पातळी किंवा इतर कोणते पर्यावरणीय घटक यास जबाबदार आहेत, हे निश्चित करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करावी, अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली आहे.

स्वच्छता मोहीम हाती

दरम्यान, तलावाच्या पाण्यात अनेक मृत मासे तरंगताना आढळले, ज्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि पणजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे व मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news