Our Time Will Come | आईच्या शोधात दोन अनाथ मुलांचा प्रवास; 'अवर टाईम विल कम' भावूक करणारी कहाणी

Our Time Will Come | 'अवर टाईम विल कम' चित्रपट चर्चेत
Our Time Will Come
Our Time Will Come
Published on: 
Updated on: 

पणजी : दीपक जाधव

लेखक-दिग्दर्शक अमरतेई अरमार यांचा 'अवर टाईम विल कम' हा चित्रपट अनाथ मुलांचे जगणे, त्यांचा संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीत निर्माण होणाऱ्या माणुसकीच्या नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी मांडतो. 'ऑलिव्हर ट्विस्ट'मधील काही घटकांना पश्चिम आफ्रिकेतील घानाची पार्श्वभूमी देत दिग्दर्शकाने समकालीन सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण केले आहे. संघर्षातून निर्माण होणारी आशा आणि आपुलकी हे चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.

Our Time Will Come
IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

पंधरा वर्षांचा ओवुसू आणि सात वर्षांची अडोबिया ही दोन अनाथ मुले अनाथाश्रमातून पळून अक्रा शहरात पोहोचतात. ओवुसूला आपल्या हरवलेल्या आईचा शोध घ्यायचा असतो. आईचे जुने छायाचित्र हाच त्याच्याकडे एकमेव आधार असतो.

अडोबियाला सोबत घेऊन सुरू झालेल्या या प्रवासात त्यांना गरिबी, फसवणूक आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. त्यांचे सामान चोरीला गेल्यानंतर चोराचा शोध घेताना त्यांची भेट झिग्गीच्या नेतृत्वाखालील रस्त्यावरच्या मुलांच्या टोळीशी होते. झिग्गी दोघांना आपल्या समूहात सामावून घेतो. रक्ताच्या नात्यापलीकडे निर्माण होणारे हे नवे कुटुंब चित्रपटाचा भावनिक केंद्रबिंदू ठरते.

घानातील गरिबी, ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर, सामाजिक दरी आणि भांडवलशाहीचे परिणाम दिग्दर्शकाने सूचकपणे मांडले आहेत. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेची मोडतोड, पर्यायी नात्यांची गरज आणि एलजीबीटीक्यू+ समुदायासंबंधीच्या २०२४ मधील वादग्रस्त विधेयकाचा संदर्भ देत राजकीय वास्तवाकडेही लक्ष वेधले आहे.

इद्रिस्सू टोंटी ज्युनियर याचा ओवुसूच्या भूमिकेतील अभिनय विशेष प्रभावी आहे. जबाबदारी, भीती, धडपड आणि आत्मविश्वास या भावना त्याने सहजतेने व्यक्त केल्या आहेत. अडोबियासोबतचे त्याचे नातेही भावते.

Our Time Will Come
Iffi Goa| सप्तरंगी इफ्फीचे पणजी कायमचे माहेरघर

चित्रपटाचे कथानक...

पंधरा वर्षांचा ओवुसू आणि सात वर्षांची अडोबिया अनाथाश्रमातून पळून अक्रा शहरात येतात. आईचा शोध घेण्यासाठी ओवुसू तिच्या जुन्या छायाचित्राचा आधार घेतो. प्रवासात त्यांचे सामान चोरीला जाते.

चोराचा शोध घेताना त्यांची भेट झिग्गीच्या समूहाशी होते. झिग्गी दोघांना आपल्या समूहात सामावून घेतो. समूहातील सुगा अडोबियाची काळजी घेते. अशा प्रकारे रक्ताच्या नात्यापलीकडे निर्माण होणाऱ्या नव्या कुटुंबाची आणि माणुसकीची कहाणी उलगडते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.