Goa Politics | गोव्यातील विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या घोषणेची वर्षपूर्ती निराशाजनक; आम आदमी पक्षाची स्वतंत्र वाटचाल सुरू

Goa Politics | विरोधींकांच्या एकजुटीच्या घोषणेची वर्षपूर्ती; काँग्रेससोबत युतीची चर्चा अद्याप अधांतरीच
Goa Assembly Election
Goa Assembly Election Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मागील वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला श्रीकृष्ण वध स्पर्धेचे औचित्य साधून फातोर्डा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत हात उंचावून एकजुतीची द्राही फिऱवली होती. या घोषणेची वर्षपूर्ती शनिवारी होत आहे. मात्र, वर्षभरात युतीतून बराच धूर निघाला आहे. आम आदमी पक्ष त्यातून बाहेर पडला आहे. गोवा फॉरवर्ड युतीच्या प्रतीक्षेत आहे, तर रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षात दोन गट पडल्याने अंतर्गत गोंधळ निर्माण झाला आहे.

Goa Assembly Election
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

विरोधींकांनी सरकारविरोधात एकजूट होऊन लढण्याची घोषणा गतवर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या दिवशी हात उंचावून केली होती. त्यावेळी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) या चार पक्षांचे नेते एकत्र आले होते. मात्र, वर्षपूर्ती होत असताना आणि विधानसभा निवडणूक येत असताना या पक्षांमधील एकजुतीला तडे गेल्याचे दिसते.

आम आदमी पक्ष तर युतीतून बाहेर पडला आहे. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यातील युतीची चर्चा अद्याप पुढे सरकलेली नाही. आरजी आणि काँग्रेस यांच्यात एकदा चर्चा झाली होती. आरजीने १२ जागांची मागणी केल्याने काँग्रेस थोडा सावध झाला आहे.

एक आमदार असलेला पक्ष १२ जागा मागितल्याने काँग्रेसमधील इच्छुक उमेदवार संतप्त झाले आहेत. गोवा फॉरवर्डने काँग्रेसला दिवाळीपूर्वी युती आणि जागावाटपाची चर्चा करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, काँग्रेस या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसत नाही.

दुसरीकडे, आरजीचे सध्या दोन गट झाले असून, काही महिन्यांपूर्वी एकत्र काम करणारे या पक्षाचे नेते आता एकमेकांची राजकीय कारकीर्द संपवण्याची भाषा करत आहेत. अशा परिस्थितीत विरोधींकांच्या एकजुटीच्या घोषणेची वर्षपूर्ती निराशाजनक ठरली आहे. आगामी काळात या पक्षांमध्ये कोणत्या घडामोडी घडतात, याकडे लक्ष लागले आहे.

Goa Assembly Election
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

आपची स्वतंत्र वाटचाल...

काँग्रेसचे आमदार निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जातात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष गोवेकरांना नको आहेत, असे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले आहे. त्यामुळे आपने विरोधींकांच्या युतीपासून वेगळे होत स्वतंत्र वाटचाल सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.