Goa Beach Shack | गोव्यातील शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! बीच शॅक धोरणाला एक वर्षाची मुदतवाढ

Goa Beach Shack | गोवा पर्यटन खात्याने बीच शॅक धोरणाला एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली असून, गुरुवारी, १० सप्टेंबरपासून शॅकचे परवाने जारी होणार आहेत.
Goa Beach Shack
Goa Beach Shack
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा पर्यटन खात्याने बीच शॅक धोरणाला एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली असून, गुरुवारी, १० सप्टेंबरपासून शॅकचे परवाने जारी होणार आहेत. शॅक नूतनीकरण प्रक्रिया लवकर सुरू होणार असून, शॅक चालकांना आधार देण्यासाठी शुल्क रचना कायम ठेवण्यात आली आहे. बीच शॅक धोरणाला एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्यामुळे शॅक चालकांना दिलासा मिळणार आहे.
येत्या हंगामात येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी शॅक सज्ज राहतील.

Goa Beach Shack
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

पर्यटन खाते १० सप्टेंबरपासून परवाने जारी करण्यास सुरुवात करेल. नूतनीकरण प्रक्रिया लवकर हाती घेतली जाईल, या निर्णयाचा उद्देश विलंब टाळणे आणि चालकांना त्यांच्या व्यवसायाची आगाऊ तयारी करण्यासाठी अधिक निश्चितता देणे हा आहे, असे पर्यटन खात्याने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी शॅकच्या शुल्क रचनेत कोणतीही वाढ न करता ती कायम ठेवण्यात आली आहे.
याबाबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे की, धोरणाला मुदतवाढ देणे व शॅक शुल्कात वाढ न करणे हे निर्णय या क्षेत्राला स्थिरता देण्यावर केंद्रित आहे. बीच शॅक हा गोव्याच्या पर्यटन ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे आणि हजारो लोकांसाठी उपजीविकेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

धोरणाला मुदतवाढ दिल्याने आणि शुल्क रचना अपरिवर्तित ठेवल्याने व्यावसायिकांना हंगामाची तयारी करण्यासाठी आवश्यक स्थिरता मिळते. आम्हाला असे वाटते की, शॅक्स तयार असावेत, व्यावसायिक सज्ज असावेत आणि पर्यटन परिसंस्था पहिल्या दिवसापासून कार्यरत असावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले की, शॅक चालकांना त्यांची उभारणी करण्यासाठी आणि पर्यटकांच्या आगमनाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून विभागाने परवाना प्रक्रिया लवकर सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे. पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गणेश चतुर्थीचा वीकेंड मिळेल. त्याच वेळी, सीआरझेड क्षेत्रातील खाजगी शॅकची अनिवार्य नोंदणी समुद्र किनाऱ्यावरील कामकाजात अधिक स्पष्टता आणि उत्तरदायित्व आणण्यास मदत करेल, असे त्यांनी नमूद केले.

Goa Beach Shack
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

शॅकचे शुल्क याप्रमाणे...

  • श्रेणी स्ट्रेच ए, वार्षिक बीच शॅक फी: १,८१,५०० रु.

  • श्रेणी स्ट्रेच बी वार्षिक फी: १,५१,२५० रु.

  • डेक बेड फी स्ट्रेच ए: ३०,००० रु.

  • डेक बेड फी स्ट्रेच बी: ३०,००० रु.

  • अर्ज प्रक्रिया शुल्क (दोन्हींसाठी): १३,००० रु. प्रत्येकी

रोजगाराचे महत्त्वाचे साधन

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक हे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असून, स्थानिक व्यावसायिक आणि कामगारांसाठी रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहेत. त्यामुळे धोरणाला मुदतवाढ आणि शुल्क रचना कायम ठेवण्याच्या निर्णयाचे शॅक व्यवसायाशी संबंधित घटकांकडून स्वागत होण्याची शक्यता आहे. आगामी हंगामात पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शॅकचालकांनी वेळेत तयारी पूर्ण करावी, यावरही पर्यटन खात्याचा भर राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news