Ponda Flyover Car Accident | फोंड्यातील अपघातात एकजण ठार

Ponda Flyover Car Accident | चौघे गंभीर जखमी : उड्डाण पुलावरून भरधाव कार कोसळली
Ponda Flyover Car Accident
Ponda Flyover Car Accident
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
फोंड्यातील कदंब बसस्थानकावरील सुमारे २० मीटर उंचीच्या उड्डाण पुलावरून भरधाव कार खाली कोसळल्यामुळे एकजण जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य चौघे गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रात्री १ च्या सुमारास घडला. मृताचे नाव प्रदीप रचय्या गौडा (वय २८) असे असून मूळ कर्नाटक राज्यातील हे कुटुंब हवेली-कुर्टी येथे राहते. जखमींत अरबाझ सनदी (वय ३०) नागझर-कुर्टी, अदनान सनदी (वय २०), इम्रान शेख (वय ४८) व आफताब सनदी (वय २५) सर्व राहणार नागा मशिद कुर्टी यांचा समावेश आहे.

Ponda Flyover Car Accident
Solapur Flight Services: सोलापूर-गोवा, बंगळुरु, हैदराबाद विमानसेवा मृगजळच

सर्व जखमींवर बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे पाचही जण 'जीए ०८ एन ०५४७' या क्रमांकाच्या कारने गोव्याबाहेर गेले होते. रात्री उशिरा पणजीहून घरी परतताना केवळ २ किलोमीटरचे अंतर उरले असताना हा भीषण अपघात घडला. पाचही जण एकमेकांचे मित्र असून, जखमींपैकी तिघे सनदी कुटुंबातील नातेवाईक आहेत. भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डाण पुलाच्या कठड्याला कारने जोरात धडक दिली. त्यामुळे कार उसळून पादचारी लेनवरून थेट खाली कोसळली.

अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे, तसेच कारमधील जखमींच्या आरडाओरडामुळे लगत असलेले लोक धावत घटनास्थळी आले. त्यानंतर फोंडा पोलिस व अग्निशामक दलाला कळवल्यानंतर बचावकार्य हाती घेऊन जखमींना बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मृत प्रदीप गौडा याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह कर्नाटक राज्यातील त्याच्या मूळ गावी नेण्यात आला. फोंडा पोलिस या अपघातप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Ponda Flyover Car Accident
Mumbai Goa National Highway : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक परिस्थिती कायम

चालकाला डुलकी लागली की...

कारच्या चालकाला डुलकी लागली की अन्य काही कारण अपघाताला कारणीभूत ठरले आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र धोकादायक वळणावर चालकाचा ताबा गेल्याने भरधाव कार नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे हा अपघात झाला. कारचा चक्काचूर झाला आहे.

बागा येथील अपघातात पर्यटकाचा मृत्यू

बागा मुख्य रस्त्यावर रविवारी पहाटे ४:३० च्या सुमारास टॅक्सी आणि स्कूटरमध्ये झालेल्या भीषण अपघातात चंदीगड येथील संजय जुनिजा (वय ५५) या पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुचाकी चालवणारा त्यांचा मुलगा कुणाल जुनिजा हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) दाखल केले आहे. पोलिसांनी टॅक्सी चालक क्रीश सुवर्णा याला ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news