Illegal Pig Transportation Case | कत्तलीसाठी डुकरांची बेकायदा वाहतूक

Illegal Pig Transportation Case | तीन संशयितांवर गुन्हा दाखल : 30 डुकरांची सुटका
Illegal Pig Transportation Case
Illegal Pig Transportation CaseAI Image
Published on
Updated on

पणजीः पुढारी वृत्तसेवा

सुमारे ३० डुकरांची कत्तलीसाठी बेकायदा वाहतूक करण्यात येत होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वाहन थांबवून सर्व डुकर जप्त केले व तिघांवर गुन्हा दाखल केला. मनोज मेघवाल (वय २५, रा. कालापूर, सांताक्रूझ) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५, ३२५ सहवाचनीय ३(५) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१) (डी), ११(१) (ई) अन्वये शिवकुमार टी. बी. पाटील, सुदीप भिस्तप्पा दोडामणी, आनंद केरूळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ३० पाळीव डुकर जप्त करण्यात आले.

Illegal Pig Transportation Case
Goa - राज्यात प्रतिदिन सात रस्ते अपघात, रेंट-ए-कार व बाईक; भाडेतत्त्वावरील वाहनांमुळे रस्ते 'मृत्यूचे सापळे'

परिसरात जुने गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणजी-बांबोळी जीए-०९-एल-४७०१ या वाहनातून हे तीनही संशयित अंदाजे ३० डुकरांची योग्य हवा खेळती राहण्याची सोय, पुरेशी जागा आणि वैध कागदपत्रांशिवाय अत्यंत क्रूर आणि अमानवीय परिस्थितीत बेकायदेशीरपणे वाहतूक करत होते. तक्रारदार आणि त्याच्या पथकाने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चालकाने बेदरकार आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवले आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. तपासणी दरम्यान, संशयित वैध वाहतूक कागदपत्रे, आरसी बुक आणि अनिवार्य पशुवैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर करण्यास अयशस्वी ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news