Goa News : नुवे-डोंगरी पश्चिम बगलमार्ग अंधारात

राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने प्रकाशव्यवस्था पूर्ववत करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
Nuvem protest
मडगाव : आंदोलन करताना नुवे व डोंगरीतील ग्रामस्थ.pudhari photo
Published on: 
Updated on: 

मडगाव : बगल नुवे-डोंगरी पश्चिम मार्गावरील पथदिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने संपूर्ण मार्ग अंधारात बुडाला आहे. या मार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नुवे येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने प्रकाशव्यवस्था पूर्ववत करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.

मडगावजवळील घाऊक मासळी बाजार ते डोंगरी या पश्चिम बगल मार्गावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि दुचाकीस्वारांना अंधारातच प्रवास करावा लागत असून, या मार्गावर सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

Nuvem protest
Goa politics : मांद्रे, पेडणे मतदारसंघांत महिला संधीच्या प्रतीक्षेत

डोंगरी येथे पूर्व आणि पश्चिम बगल मार्ग एकत्र येतात, त्या परिसरात नुकत्याच झालेल्या भीषण दुचाकी अपघातात चालक आणि मागील प्रवासी गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जमून प्रशासनाविरोधात निदर्शने केली.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) आणि संबंधित कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा आरोप केला. पथदिव्यांची दुरुस्ती का रखडली, याचा खुलासा करून सर्व दिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Nuvem protest
Goa SIR voter list : 'एसआयआर' प्रक्रिया पारदर्शकपणे

काँग्रेस नेते एव्हरसन वालेस यांनी सांगितले की, या मार्गावर जवळपास दररोज अपघात होत आहेत. पूर्ण अंधारामुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नाही. यापूर्वी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही प्रभावी कारवाई झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news