‘व्हीएलटी’, आपत्कालीन बटण 30 नोव्हेंबरपर्यंत बसवा

वाहतूक संचालनालयाची सार्वजनिक वाहन सेवा देणार्‍यांना सूचना
Notification to install location tracking device and emergency button in vehicles by November 30
‘व्हीएलटी’, आपत्कालीन बटण 30 नोव्हेंबरपर्यंत बसवा. Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : सार्वजनिक सेवा देणार्‍या वाहनांमध्ये लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (व्हीएलटी) व आपत्कालीन बटण 30 नोव्हेंबरपर्यंत बसविण्याची सूचना वाहतूक संचालक पी. प्रविमल अभिषेक यांनी मंगळवारी केली आहे. या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सार्वजनिक सेवा वाहन चालवणार्‍यांनी विक्रेत्यांकडून ‘व्हीएलटी’ व आपत्कालीन बटण खरेदी करताना एआयएस-140 या मानकांचे पालन करणारेच खरेदी करावे. ‘व्हीएलटी’ निर्माता वोईएम डिलर किंवा अधिकृत डिलर सार्वजनिक सेवा वाहनांमध्ये ‘व्हीएलटी’ उपकरणे बसवेल आणि वाहन पोर्टलवर वाहन क्रमांकासह त्याबाबतचा तपशील अद्ययावत करेल. डिव्हाईस आणि बटणाच्या जोडणीसाठी आणि दुरुस्तीची सोय करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पुरेसा वेळ देण्यात आला आहे. या तारखेनंतर वाहन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि आपत्कालीन बटणाची तरतूद सर्वांसाठी अनिवार्य असेल. अशा वाहनांच्या फिटनेस चाचणीवेळी सार्वजनिक सेवा वाहने आणि त्यांची तपासणी केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news