North Goa water sports zones notified- उत्तर गोव्यातील १४ जलक्रीडा क्षेत्रे अधिसूचित

North Goa water sports zones notified- जलक्रीडा उपक्रम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा
Goa Water Sports
Goa Water Sports
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने उत्तर गोव्यातील नद्या, तलाव आणि अन्य अंतर्गत जलस्रोतांमध्ये जलक्रीडांसाठी १४ क्षेत्रे अधिकृतपणे निश्चित केली आहेत. या निर्णयामुळे गोव्यातील संघटित जलक्रीडा उपक्रम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पर्यटन खात्याने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. गोवा जलक्रीडा नियमन धोरणाच्या कलम २४ अंतर्गत जलक्रीडा उपक्रमांचे नियमन आणि देखरेख करणे हा या क्षेत्रांच्या सीमांकनामागील मुख्य उद्देश आहे. कयाकिंग, स्टैंड-अप पॅडल बोर्डिंग, पॅडल बोटिंग, बोट राईड्स आणि रिव्हर राफ्टिंग यांसारख्या उपक्रमांसाठी आवश्यक अंतराच्या मर्यादा निश्चित करून ही क्षेत्रे अधिसूचित करण्यात आली आहेत. बागा बीच आणि नदी, तेरेखोल नदी, मायेम तलाव, मोईरा नदी, चापोरा नदी आणि समुद्रकिनारा, नेटुल नदी तसेच म्हादई नदी परिसरात ही जलक्रीडा क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत.

गोवा खंडपीठाने यापूर्वी राज्यभरातील नद्यांमध्ये बोटीद्वारे चालणाऱ्या सर्व अंतर्गत जलक्रीडा उपक्रमांवर बंदी घातली होती. जलक्रीडांसाठी स्पष्टपणे सीमांकित क्षेत्रे नसल्यामुळे पर्यटक, प्रवासी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता न्यायालयाने व्यक्त केली होती.

त्यानंतर पर्यटन खात्याने १४ जलक्रीडा क्षेत्रे अधिसूचित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. शापोरा परिसरातील पाच ठिकाणी, म्हणजेच शापोरा पट्टा, रेवोडा टैंक वाडो, नाडोडा कॉडक्सेल (व्हिक्टरी फार्म), चिखली कोलवाळे आणि उड्डो बीच येथे जलक्रीडा उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच शापोरा जेट्टीजवळही जलक्रीडांसाठी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

म्हादई नदीच्या काठावर रिव्हर फ्रंट पाळे रिसॉर्ट आणि उस्ते धरणाजवळही जलक्रीडा क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ऑगस्टमध्ये दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Goa Water Sports
Bicholim Cleanest City Goa | साखळी नगरपालिकेने पटकावला गोवा राज्यातील 'प्रथम स्वच्छ शहर'चा बहुमान; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नदीतील बोटीद्वारे चालणाऱ्या जलक्रीडा उपक्रमांसाठी सुरक्षित आणि स्पष्टपणे निश्चित केलेली क्षेत्रे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने या उपक्रमांवर बंदी घातली होती. आता पर्यटन खात्याने क्षेत्रांचे सीमांकन केल्यामुळे जलक्रीडा उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक नियामक चौकट तयार झाली आहे.

Goa Water Sports
Goa Liquor Smuggling | प्रवासी बॅगेतून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.