Goa CM Pramod Sawant | गोव्यात नव्या कॅसिनोंना बंदी! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मोठा निर्णय

Goa CM Pramod Sawant | राज्यात कोणत्याही नव्या कॅसिनोला परवानगी दिलेली नाही आणि देणार नाही, असा ठाम पुनरुच्चार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
CM Dr. Pramod sawant
CM Dr. Pramod sawant
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात कोणत्याही नव्या कॅसिनोला परवानगी दिलेली नाही आणि देणार नाही, असा ठाम पुनरुच्चार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात कॅसिनो विस्तारावरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नदीतील आणि जमिनीवरील कॅसिनो विस्तारावरून विविध स्तरांवरून चर्चा सुरू असतानाच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.

CM Dr. Pramod sawant
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

नवीन कोणत्याही कॅसिनोला परवानगी दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून मांडवीच्या पात्रात आणखी काही फ्लोटिंग कॅसिनो सुरू होणार असल्याच्या जोरदार चर्चा स्थानिक पातळीवर सुरू होत्या. या संदर्भात पणजीतील नागरिकांनी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला जात होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केले. आपण नवीन कॅसिनोला कोणताही परवाना देणार नसल्याचे ते म्हणाले. डॉ. सावंत म्हणाले, मांडवी नदीत सध्या तरंगती असलेली सहा कॅसिनो जुनीच आहेत. त्यांना पूर्वीच्या नियमांनुसार आणि कायद्यानुसार आधीच सर्व आवश्यक परवानग्या मिळालेल्या आहेत. या जुन्या सहा कॅसिनोंव्यतिरिक्त नव्याने कोणत्याही एकाही कॅसिनोला परवाना जारी करण्यात आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news